मनोरंजन

अमेझॉन प्राइम व्हिडिओने केली 'जुबली'ची घोषणा; नवीन सिरीजमध्ये नक्की आहे तरी काय?

प्रसेनजीत चॅटर्जी, अदिती राव हैदरी, अपारशक्ती खुराना, वामिका गब्बी, सिद्धांत गुप्ता, नंदिश संधू आणि राम कपूर या कलाकारांचा समावेश

वृत्तसंस्था

अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज आपली आगामी ओरिजनल सिरीज ’जुबली’च्या जागतिक प्रीमियरची घोषणा केली आहे. १० भागांची फिक्शनल ड्रामा असलेल्या या सिरीजचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केले आहे तर, याची निर्मिती सौमिक सेन आणि मोटवानी यांनी केली आहे. तसेच, एंडोलन फिल्म्सच्या सहयोगाने रिलायंस एंटरटेनमेंट आणि फँटम स्टुडिओजद्वारा निर्मित या सिरीजची पटकथा आणि संवाद अतुल सभरवाल यांनी लिहिले आहेत. अशातच, या शोमध्ये प्रसेनजीत चॅटर्जी, अदिती राव हैदरी, अपारशक्ती खुराना, वामिका गब्बी, सिद्धांत गुप्ता, नंदिश संधू आणि राम कपूर या कलाकारांचा समावेश आहे.

भारत आणि चित्रपट या दोन्हींच्या विकासाशी समांतर, ’जुबली’ अशा कथा आणि स्वप्नांचा खुलासा करते ज्यांनी हिंदी चित्रपट उद्योगाला जन्म दिला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाच्या पार्श्‍वभूमीवर आधारित, ’जुबली’ रोमांचक आणि काव्यात्मक कथा आहे जी पात्रांच्या एका समूहाभोवती विणलेली आहे आणि त्यांची स्वप्ने, आवड, महत्त्वाकांक्षा आणि प्रेम साध्य करण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. अशातच, भारत आणि २४० देश आणि प्रदेशांमधील प्राइम सदस्यांसाठी ७ एप्रिल रोजी भाग एक (एक ते पाच भाग) स्ट्रीम करू शकतात, तर भाग २ (भाग सहा ते दहा) पुढील आठवड्यात १४ एप्रिल रोजी प्रदर्शित केले जातील.

निर्माता आणि दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी म्हणाले, "’जुबली’ही एक प्रेमकथा नेहमीच माझ्या मनात राहिली आहे. जेव्हा मी चित्रपटांमध्ये असिस्टंट डायरेक्टर होतो तेव्हा सांगण्यासाठी कोणतीही कथा नव्हती पण ही कथा बनवण्याचा माझा निर्धार होता. सिरीजचा उगम सिनेमाच्या प्रसिद्ध युगातला आहे. ’जुबली’ही एक अतिशय उत्कृष्ट कथा आहे जी प्रत्येक माणसाबद्दल काहीतरी बोलते. यामुळेच मी कथेकडे प्रथम आकर्षित झालो. आम्ही आपले युग अनुरूप बनवून ठेवण्यासाठी सिरीजमधील प्रत्येक पैलूवर कठोर परिश्रम घेतले आहेत तसेच, संशोधन केले आहे. एका अप्रतिम स्टुडिओच्या समर्थनाने झालेला हा प्रवास उत्कृष्ट आहे, ज्यामध्ये अद्भुत अभिनेता आणि आतापर्यंतची सर्वोत्तम टीमचा समावेश आहे. आम्हाला ही सिरीज बनवताना खूप मजा आली आणि आता जग आमचे काम पाहणार असून, यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.

Bihar Election Results 2025 Live Updates: एनडीए २०० च्या पार; "ही ज्ञानेश कुमार यांची जादू"; काँग्रेसच्या भूपेश बघेल यांची टीका

Assembly Bypolls Result 2025 : अंतापाठोपाठ जुबली हिल्समध्येही काँग्रेसचा दमदार विजय; बघा अन्य ६ जागांवर कोणाची बाजी?

सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन; ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Red Fort Blast : दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी मोठी कारवाई; मास्टरमाईंडचे घर सुरक्षा दलाने उडवले

CSMT : लाल बॅगेचं गूढ उलगडलं! कोणताही धोका नाही, बॅगेत आढळल्या 'या' वस्तू