मनोरंजन

‘अनोरा’ चित्रपटाला पाच ऑस्कर पुरस्कार

‘ॲॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स‌ ॲॅण्ड सायनेन्स’च्या ९७ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘अनोरा’ या चित्रपटाने बाजी मारली. या चित्रपटाने एकूण पाच ऑस्कर पुरस्कार मिळवले आहेत.

Swapnil S

लॉस एंजेलिस : ‘ॲॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स‌ ॲॅण्ड सायनेन्स’च्या ९७ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘अनोरा’ या चित्रपटाने बाजी मारली. या चित्रपटाने एकूण पाच ऑस्कर पुरस्कार मिळवले आहेत.

लॉस एंजेलिसच्या हॉलिवूड डॉल्बी थिएटरमध्ये हा भव्यदिव्य सोहळा झाला. ‘एमिलिया पेरेज’ला सर्वात जास्त नामांकन मिळाले, तर ‘अनोरा’ या चित्रपटाने ५ पुरस्कार मिळवले आहेत.

सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ‘अनोरा’, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक शॉन बेकर (अनोरा), सर्वोत्कृष्ट अभिनेता एडियन ब्रॉडी (द ब्रुटलिस्ट), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री माईकी मॅडिसन (अनोरा), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री कीरन कल्किन (द रियल पेन), सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘आय एम स्टील हिअर’ (ब्राझील), सर्वोत्कृष्ट ॲॅनिमेडेट चित्रपट ‘फ्लो’, सर्वोत्कृष्ट माहितीपट‘नो अदर लँड’, सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा (अनोरा), सर्वोत्कृष्ट माहितीपट शॉट - ‘द ओन्ली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा’, बेस्ट लाइव्ह ॲॅक्शन शॉट- आय एम नॉट ए रोबोट’, सर्वोत्कृष्ट ॲॅनिमेटेड लघुपट- ‘इन द शॅडो ऑफ सायप्रस’, सर्वोत्कृष्ट मूळ गाणे-एल मल, सर्वोत्कृष्ट संगीत-ड्यून : पार्ट २, सर्वोत्कृष्ट छायांकन- द ब्रुटलिस्ट, सर्वोत्कृष्ट रंगभूषा व केशभूषा-द सबस्टेंस, सर्वोत्कृष्ट वेशभूषा-विक्ड, सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलन-अनोरा.

हे आहेत पुरस्कार विजेते चित्रपट

अनोरा - ५ पुरस्कार,

एमिलिया पेरेज - २ पुरस्कार,

द ब्रूटलिस्ट - ३ पुरस्कार,

विक्ड - २ पुरस्कार,

ड्युन : पार्ट - २ पुरस्कार.

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

मुंबईत हाय अलर्ट! ३४ मानवी बॉम्ब पेरल्याची धमकी; 'लष्कर ए जिहादी'चा पोलिसांना संदेश

मला विचारून 'जीआर' काढल्याचा गैरसमज पसरवू नका! मंत्री भुजबळांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना थेट इशारा

अंजना कृष्णा धमकी प्रकरण : अजितदादांची सारवासारव; अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता!

भारत आणि रशियाला आम्ही गमावले! ट्रम्प यांना उशिरा सुचले शहाणपण