मनोरंजन

Gharat Ganpati: रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा दिसणार अजिंक्य आणि अश्विनी यांची जोडी

Ajinkya Deo & Ashwini Bhave: आजवर रुपेरी पडद्यावर नायक नायिकेच्या अनेक लोकप्रिय जोड्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवणारी अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे.

Tejashree Gaikwad

New Marathi Movie: आजवर रुपेरी पडद्यावर नायक नायिकेच्या अनेक लोकप्रिय जोड्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवणारी अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे. लवकरच पुन्हा एकदा ही जोडी ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रसिक दरबारी हजेरी लावणार आहे. प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या सुरेख टीझर नंतर हा चित्रपट रसिकांसाठी वेगळी ट्रीट असणार हे नक्की.

पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘घरत गणपती’ हा भव्य चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हे ही वाचा

शरद घरत आणि अहिल्या घरत या व्यक्तिरेखा ते साकारणार आहेत. या चित्रपटात अजिंक्य देव आपल्याला कुटुंबवत्सल पती, प्रेमळ वडिल अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱ्या करारी आईची व्यक्तिरेखा अश्विनी भावे साकारणार आहेत. याआधी ‘शाब्बास सूनबाई’,‘मायेची सावली’,‘चल गंमत करू’, ‘सरकारनामा’ या चित्रपटांद्वारे आमच्यातली केमिस्ट्री पडद्यावर चांगलीच खुलली आता २५ वर्षांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करण्याचा आनंद व्यक्त करीत, आमची केमिस्ट्री रसिकांना आनंद देईल, असं हे दोघे सांगतात. चित्रपटाचा सुंदर विषय व आमचे काम प्रेक्षकांना नक्कीच भावेल, असा विश्वासही दोघांनी व्यक्त केला.

आधीच्या चित्रपटातील या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली असल्याने ही जोडी पुन्हा एकत्र असणं हा ‘घरत गणपती’ चित्रपटाचा सर्वात मोठा ‘प्लस पॉइंट’ आहे. श्री गणराया’च्या आगमनाच्या निमित्ताने घरत कुटुंबातल्या अनुबंधाची हलकी-फुलकी गोष्ट ‘घरत गणपती’ चित्रपटात पहायला मिळणार आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग