वाइल्ड कार्ड घरात येताच झालं सुरू; रुचिताशी पंगा घेणं रेवाला पडलं महागात, म्हणाली Get Lost!!! 
मनोरंजन

Bigg Boss Marathi 6 : वाइल्ड कार्ड घरात येताच झालं सुरू; रुचिताशी पंगा घेणं रेवाला पडलं महागात, म्हणाली Get Lost!!!

'बिग बॉस मराठी ६'च्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून पाऊल टाकताच अभिनेत्री रेवा कौरासेची रुचिताशी जोरदार खडाजंगी झाली. घरात प्रवेश केल्यानंतर काही क्षणांतच दोघींमध्ये शाब्दिक चकमक रंगली आणि वाद इतका वाढला की रुचिताने रागाच्या भरात रेवाला get lost!!! म्हणत चांगलेच सुनावले.

Mayuri Gawade

बिग बॉस मराठीचा सहावा सिझन सध्या चांगलाच रंगात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या भागात रोशन भजनकर घराबाहेर पडल्यानंतर खेळात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. कारण घरात एक नव्हे, तर तब्बल तीन वाइल्ड कार्ड एंट्रीज् झाल्या आणि एंट्री होताच वातावरण तापलं.

अभिनेता संकेत पाठक, संस्कृती साळुंके आणि रेवा कौरासे या तिघांनी बिग बॉसच्या घरात पाऊल टाकताच जुन्या सदस्यांची समीकरणं ढासळू लागली आहेत. या तिघांच्या आगमनानंतर प्रेक्षकांमध्येही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

अभिनेत्री रेवा कौरासेने हिंदी मालिकांमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तर अभिनेता संकेत पाठक 'दुहेरी', 'लग्नाची बेडी' या सारख्या मालिकांमुळे घराघरात पोहोचला. संस्कृती साळुंकेने विविध रिॲलिटी शोमधून आपली वेगळी छाप पाडली आहे. आता हे तिघेही बिग बॉस मराठीच्या घरात स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

एंट्री होताच पंगा!

घरात येताच रेवाने थेट रुचिताशीच पंगा घेतल्याचं पाहायला मिळालं. समोर आलेल्या नव्या व्हिडिओमध्ये रेवा आणि रुचिता आमनेसामने येताना दिसत आहेत. रेवा रुचिताला म्हणताना दिसते, "बाहेर लोकांचं असं झालंय की रुचिताला बंद करा यार… आवाज नाही ऐकायचाय हिचा…" यावर रुचिताही मागे हटत नाही. "मी तुला काही विचारलं नाहीये. आली मोठी शहाणी," असं ती प्रत्युत्तर देते.

रेवा पुढे म्हणते, "हे सगळं करून तू छान दिसत नाहीयेस." त्यावर रुचिताचा संताप अनावर होतो. "मी छान दिसतेय, वाईट दिसतेय.. मला याच्याशी काही घेणं देणं नाहीये," असं ती ठणकावते. त्यानंतर रेवा तिचा हात धरून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताच रुचिता आणखी भडकते आणि "डोन्ट टच मी, डोन्ट टच मी… गेट लॉस्ट," असं स्पष्ट शब्दांत सांगते.

आता गेम पालटणार?

तीन वाइल्ड कार्ड एंट्रींनंतर घरातील समीकरणं पुन्हा एकदा बदलताना दिसत आहेत. आधीच तुटलेल्या टोळीमध्ये फूट पडलेली असताना नवे सदस्य त्याचा फायदा घेतील का? की जुन्या सदस्यांना एकत्र येण्याची वेळ येईल? आता पुढील काही दिवसांत बिग बॉसच्या घरातील खेळ कोणत्या दिशेने वळतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

Navi Mumbai : खारघर हाफ मॅरेथॉनमुळे उद्या वाहतुकीत बदल; पहाटे ५ वाजल्यापासून 'या' मार्गांवर निर्बंध, वाहतूक पोलिसांकडून सूचना

मुंबईत ATS ची मोठी कारवाई! माहीममधून तरुणाला अटक; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय

Philippines Plane Crash : प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाच्या दोन विमानांची धडक; चार वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, Video

Video : हॉस्टेलमध्ये 'अँटी-सुसाइड' पंखे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरतमधील विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय