मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: गोलीगत सूरज चव्हाण म्हणतोय..."मी एकदम साधा माणूस, पण राग आला तर..."

Suraj Chavan: आजच्या भागात सूरज पॅडी दादा आणि अंकितासोबत गप्पा मारताना दिसून येणार आहे.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi Day 48 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन ४७ दिवस पूर्ण झाले असून आज ४८ वा दिवस सुरू आहे. याचदरम्यान सूरज चव्हाणच्या झापुक झुपुकने जिंकलय सगळ्यांचं काळीज. 

'बिग बॉस मराठी'च्या घरातील गोलीगत सूरज चव्हाणने अल्पावधीतच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आजच्या भागात सूरज पॅडी दादा आणि अंकितासोबत गप्पा मारताना दिसून येणार आहे.

दरम्यान सूरज म्हणतोय,"गाव म्हत्त्वाचं आहे मला. कधी गावाकडे जातोय आणि सर्वांना भेटतोय असं मला झालंय. इथे नुसता आरडाओरडा सुरू असतो". त्यावर अंकिता म्हणते,"आपल्या भावनांवर कंट्रोल करणं गरजेचं आहे". सूरज पुढे म्हणतो,"मी एकदम साधा माणूस आहे. पण राग आला तर मी पुढचं मागचं बघत नाही. इथे मी स्वत:ला खूप कंट्रोल केलंय". त्यानंतर सूरज पॅडी दादांची मसाज करताना दिसून येतो. सूरजचा मसाज पाहून पॅडी दादा म्हणतात,"तुला मसाज काय असतो तेच दाखवतो". 'बिग बॉस'च्या घरात न बोलणारा सूरज चव्हाण आता हळूहळू बोलायला लागलेला आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश