मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: "निक्कीसाठी मी कोणतंही फेव्हर देणार नाही..." निक्की आणि वैभवमध्ये पडली वादाची ठिणगी

Nikki Tamboli, Vaibhav Chavan: २५व्या दिवशी निक्की तांबोळी आणि वैभव चव्हाण यांच्यात वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळणार आहे.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi New Season : 'बिग बॉस मराठी'चं नवं पर्व सुरू झालं आहे. यंदा घरात एकाहून एक तगडे सदस्य आहेत. प्रत्येक सदस्य वेगळ्या धाटणीचा आहे. अभिनेते, गायक ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांच्यापर्यंत अनेक लोक पाहायला मिळत आहेत. २५व्या दिवशी निक्की तांबोळी आणि वैभव चव्हाण यांच्यात वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या 'सत्याचा पंचनामा' हे कार्य पार पडत आहे. यासंदर्भातला आजच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये वर्षा ताईंचा सत्याचा पंचनामा होताना दिसत आहे. दरम्यान वैभव म्हणतो,"निक्कीसाठी मी कोणतंही फेव्हर देणार नाही". यावर निक्की म्हणते,"मी माझ्या मतावर ठाम आहे". त्यावर वैभव निक्कीला म्हणतो,"तू थेट तुझं मत मांडू शकत नाही". दुसरीकडे घन:श्याम म्हणतोय,"निक्कीच्या अशा वागणुकीमुळे टीमचा घात होऊ शकतो". वैभव निक्कीला म्हणतो,"तुला बोलण्याचा मला हक्क आहे".

सत्याचा पंचनामामध्ये सदस्य काय धमाका करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. तसेच या आठवड्यात कोणते सदस्य नॉमिनेट होणार हेदेखील लवकरच समोर येईल.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य