मनोरंजन

"महाराष्ट्रात जे काही एखादं नाव गाजतंय, त्यांना तर मी आधीच..."; बिग बॉसच्या घरात जाताच राधा पाटीलने गौतमीला डिवचले

बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची दणक्यात सुरुवात झाली आहे. घरात पहिलं पाऊल टाकताच लोकप्रिय नृत्यांगना राधा पाटील उर्फ राधा मुंबईकरने केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं आहे. बिग बॉसमध्ये येताच राधाने थेट गौतमी पाटीलचं नाव घेत हल्लाबोल केला.

Mayuri Gawade

बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची दणक्यात सुरुवात झाली आहे. घरात पहिलं पाऊल टाकताच लोकप्रिय नृत्यांगना राधा पाटील उर्फ राधा मुंबईकरने केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं आहे. बिग बॉसमध्ये येताच राधाने थेट गौतमी पाटीलचं नाव घेत हल्लाबोल केला.

कार्यक्रमाच्या ग्रँड प्रीमिअरसाठी खास डान्स करत एण्ट्री केलेल्या राधा पाटीलचा आत्मविश्वास पाहून अभिनेता आणि बिग बॉस मराठीचा सूत्रसंचालक रितेश देशमुखने तिचं कौतुक केलं आणि खरंतर तुमचं नाव 'राडा' पाटील पाहिजे होतं असं म्हटलं. त्यावर, "हो 'राडा' करतेच मी, ठेऊया आपण", असे उत्तर देत राधाने या हंगामात आपण काय करणार आहोत याची जणू झलकच दाखवून दिली. त्यानंतरच्या तिच्या उत्तरात तर तिने थेट गौतमी पाटीलवरच निशाणा साधला.

रितेशने "तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण?" असा प्रश्न राधाला विचारला असता त्यावर, 'मला तरी वाटतं मीच आहे' असे ती क्षणात म्हणाली. एवढ्यावरच न थांबता, 'असे मी खूप लोकांना पळवून लावलंय, आणि जे काही महाराष्ट्रामध्ये एक नाव गाजतंय...इकडे-तिकडे...त्यांना तर मी खूप आधीच पळवून लावलंय. मी माझ्या टॅलेंटनुसार तर कोणाला घाबरत नाही...मग स्टेजवर कोणीही आलं तरी..मग ती गौतमी पाटील असो किंवा कोणीही असो...आम्ही नाही घाबरत" असे म्हणत तिने गौतमीला डिवचले.

गौतमीही दिसणार होती बिग बॉसच्या घरात

विशेष म्हणजे, बिग बॉस मराठीचे सहावे पर्व सुरू होण्याआधी गौतमी पाटील शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. त्यावर, बिग बॉससाठी विचारणा झाली होती, पण आईपासून दूर राहणं शक्य नसल्यामुळेच आपण शोमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचं गौतमीने स्पष्ट केलं. आता राधा पाटीलने थेट नाव घेत डिवचल्याने गौतमीचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. राधाच्या या विधानावर गौतमी पाटील काय प्रतिक्रिया देते, याकडे प्रेक्षकांसह सोशल मीडियाचंही लक्ष लागून राहिलं आहे.

Maratha Reservation : सरकारकडून निव्वळ फसवणूक - मनोज जरांगे; उपोषणाचा ११ वा दिवस, सलाईन घेतले

विरोधक म्हणजे 'नाराज फुफा'; प्रगती झाली तरी तक्रारी चालूच, मोदींचा हल्लाबोल; डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरचे उद्घाटन

PM Modi's Mumbai Event: कार्यक्रमस्थळी बनावट PMO अधिकारी; बॉडीगार्ड आणि बंदुकीसह ताब्यात, सुरक्षेतील मोठी त्रुटी उघड

मोहम्मद अली रोड अतिक्रमणमुक्त; फुटपाथवरील बेकायदा स्टॉल्स, दुकाने, बांधकामांवर हातोडा; BMC च्या 'बी' वॉर्डात धडक कारवाई

Mumbai : बीकेसी शॉपिंग मॉलमध्ये तिघा संशयितांना अटक