मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: "चुकीच्या माणसाला निवडलंय..." 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्याच दिवशी पॅडी भडकला

Pandharinath Kamble: नवीन प्रोमोनुसार आज एका टास्क दरम्यान आजच्या भागात पॅडी कांबळे भडकलेला दिसत आहे.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi New Season Day 2 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवत आहे. पहिल्या दिवशी सदस्यांना पाणी नसणं, नाश्ता न मिळणं अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. याचदरम्यान आता शोच्या दुसऱ्या दिवशी बिग बॉसच्या घरात किराणा वरून राडा होताना दिसणार आहे. दुसऱ्या दिवशी बिग बॉस ने घरातील सदस्यांना ओव्हरऑल निर्णय घेण्यात कमी पडत असलेल्या तीन सदस्यांची नावे सांगायला लावली. सदस्यांनी सर्वानुमते सूरज चव्हाण, इरिना रूडाकोवा आणि धनंजय पोवार या तीन सदस्यांची नावे घेतली. पण आजच्या भागात याच तीन सदस्यांना 'बिग बॉस'ने मोठा निर्णय घ्यायला लावला असल्याचं पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये हे तिन्ही सदस्य निर्णय घेण्यात जास्त वेळ लागत असल्याने आजच्या भागात पंढरीनाथ कांबळे भडकलेला दिसत आहे.

नक्की काय झालं?

इरिना, सूरज आणि धनंजय यांना बिग बॉस त्यांच्याकडे असलेल्या बीबी करन्सीमधून घरासाठी लागणाऱ्या गोष्टी आणि किराणा विकत घ्यायला सांगतात. दरम्यान डीपी म्हणजेच धनंजय पोवार म्हणतो,"आपल्याला चना डाळ आणि मूग डाळ तर घ्यावं लागेल". त्यावर इरिना म्हणते,"सगळचं घ्या... निर्णय घेण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवत आहे". इरिना आणि धनंजयच्या संभाषणावर सूरज म्हणतो,"आता माझं डोकं पिकायला लागलंय". तर धनंजय म्हणतो,"माझं फुटलं". यावर सूरज पुढे म्हणतो,"तुझं फुटलंय माझं तुटेल".

या गोष्टी बोलण्यात वेळ जात असल्याने पंढरीनाथ कांबळे त्यांच्यावर चांगलेच भडकलेला दिसत आहे. . प्रोमोमध्ये पंढरीनाथ "चुकीच्या माणसाला निवडलंय आपण..." असं बोलताना दिसत आहे.

सूरज चव्हाण, इरिना रूडाकोवा आणि धनंजय पोवार घरातील सदस्यांसाठी काय-काय राशन घेणार?, घरातील सदस्यांना उत्तम जेवण मिळणार का? हे सगळं आजच्या भागात बघायला मिळाला आहे.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी