LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

गॅस एजन्सीकडे जाण्याची किंवा रांगेत उभे राहण्याची गरज नाही. भारत गॅस, इंडेन आणि एचपी गॅस ग्राहकांना आता WhatsApp, मिस्ड कॉल, IVRS, मोबाईल ॲप आणि वेबसाइटद्वारे घरबसल्या LPG सिलिंडर बुक करता येणार आहे. जाणून घ्या सोपे पर्याय.
LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध
LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबईसह देशातील काही भागांत एलपीजी सिलिंडर पुरवठ्याबाबत तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (Ministry of Petroleum and Natural Gas) सोशल मीडियावर एक माहितीपर पोस्ट शेअर करत घरबसल्या LPG सिलिंडर बुक करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध सोयींबाबत ग्राहकांना जागरूक केले आहे.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारत गॅस (Bharat gas), इंडेन (Indane) आणि एचपी गॅस (HP Gas) या कंपन्यांच्या ग्राहकांना आता LPG रिफिल बुक करण्यासाठी अनेक डिजिटल आणि दूरध्वनी सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना गॅस वितरकाकडे जाण्याची किंवा रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.

'या' सोप्या मार्गांनी करा LPG सिलिंडर बुकिंग

१. व्हॉट्सॲपद्वारे बुकिंग
ग्राहक संबंधित कंपनीच्या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश पाठवून LPG रिफिल बुक करू शकतात.

  • भारत गॅस : १८०० २२ ४३४४

  • इंडेन : ७५८८८८८८२४

  • एचपी गॅस : ९२२२२०११२२

२. मिस्ड कॉल सुविधा
इंटरनेटची गरज नसताना फक्त मिस्ड कॉल देऊनही LPG बुकिंग करता येते.

  • भारत गॅस : ७७१०९५५५५५

  • इंडेन : ८४५४९५५५५५

  • एचपी गॅस : ९४९३६०२२२२

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध
LPG ग्राहकांनो लक्ष द्या! e-KYC अनिवार्य; मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करा ही प्रक्रिया

३. IVRS प्रणाली
ग्राहक नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून IVRS नंबरवर कॉल करून सूचनांनुसार सिलिंडर बुक करू शकतात.

  • भारत गॅस : ७७१५०१२३४५

  • इंडेन :७७१८९५५५५५

  • एचपी गॅस : ८८८८८२३४५६

मोबाईल ॲपद्वारेही बुकिंग

संबंधित कंपन्यांनी LPG सेवांना अधिक सोयीस्कर करण्यासाठी मोबाईल ॲप्सही उपलब्ध करून दिली आहेत.

  • Hello BPCL - भारत गॅस ग्राहकांसाठी

  • Indian Oil One - इंडेन ग्राहकांसाठी

  • HP Pay - एचपी गॅस ग्राहकांसाठी

या ॲप्सच्या माध्यमातून ग्राहक LPG रिफिल बुकिंग, डिलिव्हरी स्थिती तपासणे आणि गॅस खात्याशी संबंधित इतर सेवा देखील वापरू शकतात.

वेबसाइटवरूनही करता येते बुकिंग

याशिवाय ग्राहक संबंधित कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटवरूनही LPG सिलिंडर बुक करू शकतात.

मंत्रालयाने ग्राहकांना या डिजिटल सुविधांचा वापर करून घरबसल्या LPG रिफिल बुक करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे LPG सेवा अधिक जलद, सोयीस्कर आणि सुलभ करण्याचा सरकारचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in