मनोरंजन

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक प्रवीण कारळे काळाच्या पडद्याआड, पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

नवशक्ती Web Desk

'हृदयात समथिंग समथिंग' फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं आज सकाळी १० वाजता निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. आज (२३ जून) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालायत त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. कारळे यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

लोकप्रिय मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण कारळे हे नाट्य आणि चित्रपट समीक्षक राजा कारळे यांचे पूत्र होते. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. ते अगदी लहानपणापासूनच सिनेक्षेत्रात कार्यरत होते. त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले होते. त्यात 'बोकड', 'भैरु पैलवान की जय', 'माझी आशिकी', 'मानसन्मान' आणि 'हृदयात समथिंग समथिंग' हे गाजलेले चित्रपट आहेत.

प्रवीण कारळे यांच्यावर आज संध्याकाली पुण्यातील वारजे इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Mumbai Local Mega Block Update : प्रवाशांनो लक्ष द्या...रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक, जाणून घ्या डिटेल्स

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज Metro-3 चे उद्घाटन; अंतर्गत रिंग मेट्रो, ठाणे पालिकेच्या नवीन इमारतीचेही भूमिपूजन

पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार; पोलिसांकडून संशयित आरोपींचे स्केच जारी

निराधार दुर्गांची जीवनभरारी! बालगृहातील भगिनी ते अधीक्षिका; सांगलीच्या सपनाचा स्फूर्तिदायी प्रवास

इस्त्रायलचा खात्मा करणार; इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांची गर्जना