मनोरंजन

Antarpat Serial: 'अंतरपाट'मध्ये रंगणार गौतमी -क्षितिजच्या लग्नाचा अद्वितीय महासप्ताह

Tejashree Gaikwad

Rashmi Anpat and Ashok Dhage: कलर्स मराठी वाहिनीवरील नुकतीच सुरु झालेली नवी मालिका 'अंतरपाट' ही चांगलीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून रसिकवर्ग नव्या मालिकेला भरभरून प्रेम देत आहेत. तुम्ही मालिकेत पाहू शकता की , रश्मी अनपट आणि अशोक धगे म्हणजेच आपले गौतमी आणि क्षितिजचे लवकरच लग्न पार पडणार असून प्रेक्षकांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे.

गौतमी आणि क्षितिज यांच्या लग्नाचा हा अद्वितीय महासप्ताह कलर्स मराठीवर आपल्याला दिसणार असून त्याची सुरुवात देखील झाली आहे. काही दिवसांआधी श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये गौतमी आणि तिच्या परिवाराने बाप्पाच्या चरणी पत्रिका अर्पण केली. त्यानंतर त्या दोघांचे केळवण अगदी छान पारंपरिक पद्धतीने थाटामाटात पार पडले.

या सगळ्यानंतर महत्वाचा क्षण म्हणजे लग्न. लग्न म्हणजे एक संस्कार... आपल्या संस्कृतीचा आरसा म्हणता येईल. असा महत्वाचा विधी ज्यामध्ये विविध पद्धतीच्या विधी आणि त्यातून झळकणारे वेगळेपण आपल्याला दिसत असते. पण आजकालच्या चकचकीत रोषणाईने सजवलेले हॉल, ट्रेंडिंगच्या नावाखाली केले जाणारे विविध प्रकार, या सगळ्या गर्दीमध्ये महाराष्ट्राची परंपरा आणि सांस्कृतिक वैभव जपणारे  परंपराची उजळणी करून देणारे एक साधे सोज्वळ पण तितकेच सुंदर असे लग्न म्हणजे कलर्स मराठीवरील 'अंतरपाट' या मालिकेमधल्या क्षितीज आणि गौतमीचे लग्न.

गौतमी- क्षितिज यांचा विवाह विधी एखाद्या हॉलमध्ये न करता अत्यंत सुंदर वेगळेपणा देणाऱ्या वाड्यात पार पडणार आहे. या वाड्यात झगमगती रोषणाई आणि सजावट न करता महाराष्ट्रीय संस्कृतीत महत्वाचे मानले जाणाऱ्या झेंडूच्या फुलांनी सजावट केली आहे. या शिवाय रांगोळी, फुलांची सजावट तसेच मराठमोळी संस्कृतीची ओळख असलेले आभूषण आणि येणाऱ्या पाहुण्यांना कोकणचा आनंद मिळावा, म्हणून वेलकम ड्रिंकमध्ये कोकणी शहाळ्याचे पाणी , कोकम सरबत आणि पन्हं दिले आहे. त्याचबरोबर येणाऱ्या पाहुण्यांना मोदक ते देखील अस्सल तुपाची धार सोडून देणार. शिवाय हे सगळे जेवण केळीच्या पानात दिले जाणारे आहे आणि या सगळ्यात ऐकायला येतील मराठी लोककलेची लोकगीते जी प्रत्यक्षात लोककलाकार सादर करतील. म्हणजे केवळ बघण्यातच नाही तर ऐकण्यात सुद्धा पारंपारिक वैभव झळकत आहे.

कलर्स मराठीवर दररोज संध्याकाळी ७:३० वाजता लागणाऱ्या 'अंतरपाट' या मालिकेतील गौतमी आणि क्षितिज यांचे अविस्मरणीय लग्न संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकवर्ग देखील अनुभवू शकतात.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था