मनोरंजन

India's Got Latent : राखी सावंतला महाराष्ट्र सायबर सेलचं समन्स; रणवीर अलाहाबादियाला २४ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

आता बॉलिवूड अभिनेत्री आणि ड्रामा क्वीन राखी सावंत देखील महराष्ट्र सायबर सेलच्या रडारवर आली असून राखीला समन्स बाजावण्यात आले आहे.

Krantee V. Kale

गेल्या अनेक दिवसांपासून ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याने माता-पित्याच्या संबंधांबाबत केलेल्या अश्लील टिप्पणीमुळे चहुबाजूंनी या शोवर टीकेची झोड उठली आहे. याप्रकरणी आता बॉलिवूड अभिनेत्री आणि ड्रामा क्वीन राखी सावंत देखील महराष्ट्र सायबर सेलच्या रडारवर आली असून राखीला समन्स बाजावण्यात आले आहे.

महाराष्ट्र सायबर सेलने राखी सावंतला समन्स बजावून येत्या २७ फेब्रुवारीला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सायबर सेलचे आयजी यशस्वी यादव यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना याबाबत माहिती दिली. रणवीर अलाहबादिया आणि आशिष चंचलानीलाही सायबर सेलने २४ फेब्रुवारी रोजीचे समन्स बजावून जबाब नोंदवण्यासाठी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. समय रैनाने राज्य सायबर सेलसमोर हजर होण्यासाठी १७ मार्चपर्यंत मुदतवाढ मागितली होती, ती नाकारण्यात आल्याचेही यादव यांनी सांगितले.

‘इंडियाज गॉट लॅटेंट’ हा शो ज्या भागामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला त्या भागात राखी सावंत नव्हती. मात्र त्यापूर्वीच्या दोन भागांत राखी झळकली होती. त्यामुळे तिलाही समन्स पाठवण्यात आल्याचं समजतंय. तथापि, दुबईमध्ये शिफ्ट झाल्यामुळे राखी २७ फेब्रुवारीला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहणार की नाही हे अद्याप समजू शकलेलं नाही.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस