मनोरंजन

राजस्थानची मनिका विश्वकर्मा मिस युनिव्हर्स इंडिया २०२५

राजस्थानच्या मनिका विश्वकर्माने येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ चा किताब जिंकला. गेल्या वर्षीची विजेती रिया सिंघा हिच्या हस्ते मणिकाला मुकुट प्रदान करण्यात आला.

Swapnil S

जयपूर : राजस्थानच्या मनिका विश्वकर्माने येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ चा किताब जिंकला. गेल्या वर्षीची विजेती रिया सिंघा हिच्या हस्ते मणिकाला मुकुट प्रदान करण्यात आला. या विजयासह, नोव्हेंबर महिन्यात थायलंडमध्ये होणाऱ्या ७४ व्या 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत मनिका भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

मनिका ही मूळची राजस्थानच्या श्री गंगानगर येथील असून सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या मनिकाने गेल्या वर्षी 'मिस युनिव्हर्स राजस्थान'चा किताब जिंकला होता. मनिका केवळ एक सौंदर्यवती नसून एक सामाजिक कार्यकर्ती देखील आहे. ती 'न्यूरोनोव्हा' या संस्थेची संस्थापक आहे. या माध्यमातून ती न्यूरोडायव्हर्जन्स, म्हणजेच एडीएचडीसारख्या मानसिक स्थितींबद्दल समाजात असलेला दृष्टिकोन बदलण्यासाठी काम करते.

मनिकाने यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत 'बिमस्टेक सेवोकोन'मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. एक उत्कृष्ट वक्ता आणि कलाकार म्हणूनही तिची ओळख आहे. ललित कला अकादमी आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स यांसारख्या नामांकित संस्थांनी तिचा सन्मान केला आहे.

विजयानंतर मनिका भावुक

'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५'चा मुकूट डोक्यावर चढल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना मनिका म्हणाली, माझा प्रवास गंगानगर शहरातून सुरू झाला. मी दिल्लीत येऊन या सौंदर्य स्पर्धेसाठी खूप तयारी केली. ज्यांनी ज्यांनी मला मदत केली आणि या टप्प्यापर्यंत पोहोचण्यास मदत केली त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानते. ही स्पर्धा म्हणजे एक वेगळेच विश्व आहे. इथे आपले व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य घडते. ही जबाबदारी केवळ एका वर्षाची नसून आयुष्यभरासाठी माझ्यासोबत राहील.

अमरावतीत मोठी कारवाई! लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयाजच्या घरावर बुलडोझर; अनधिकृत बांधकाम पाडले, VIDEO

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

चहाच्या टपरीवर रेल्वे कर्मचारी कोसळला; ३ मिनिटे तडफडल्यानंतर मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी

Mumbai : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबादेवी मंदिरात आंबा महोत्सव; भक्तांसाठी खास सोहळा