मनोरंजन

Manjar Marathi Movie : 'तेच खरे युथ!' ज्येष्ठ कलाकारांसोबत कामाचा अनुभव सांगताना 'मांजर'च्या टीमसोबत दिलखुलास गप्पा

आगामी मराठी चित्रपट 'मांजर'च्या निमित्ताने सिद्धार्थ मेनन, तेजस राऊत आणि वैष्णवी आंधळे यांनी 'नवशक्ती'शी दिलखुलास गप्पा मारल्या. ज्येष्ठ कलाकारांसोबत कामाचा अनुभव, सेटवरील किस्से आणि 'मांजर'बाबत असलेलं गूढ याबाबत त्यांनी शेअर केलं.

Mayuri Gawade

चार मित्रांचं बिनधास्त जगणं, त्यांच्यातली धमाल आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ… 'मांजर' या आगामी मराठी चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तरुण कलाकारांसोबत ज्येष्ठ आणि अनुभवी कलाकारांचीही मांदियाळी पाहायला मिळणार आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ मेनन, तेजस राऊत आणि वैष्णवी आंधळे यांनी 'नवशक्ति'शी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव, ज्येष्ठ कलाकारांसोबत काम करताना आलेली मजा आणि 'मांजर'बाबत असलेलं गूढ याबद्दल संवाद साधला.

चित्रपटात ओंकार भोजने आणि भाग्यश्री लिमये यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत सयाजी शिंदे, अश्विनी काळसेकर आणि अंशुमन विचारे यांसारखे अनुभवी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तरुण कलाकारांसोबत काम करताना ज्येष्ठ कलाकारांचा दबाव जाणवला का, असा प्रश्न विचारला असता, कलाकारांनी मात्र हा अनुभव दबावाचा नसून शिकण्याचा आणि आनंदाचा असल्याचे सांगितले.

ज्येष्ठ कलाकारच 'खरं युथ'; 'मांजर'च्या कलाकारांनी सांगितला अनुभव

"खरं तर त्यांच्यासोबत काम करताना कोणताही दबाव जाणवला नाही. उलट त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली. तेच खरे 'युथ' आहेत. त्यांच्या कामातून अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या," अशा भावना कलाकारांनी व्यक्त केल्या. सेटवर ऑफस्क्रीनही धमाल करत, एकमेकांसोबत एन्जॉय करत काम केल्यामुळे चित्रपटातील मैत्री आणि केमिस्ट्री पडद्यावरही तितकीच सहज दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

'मांजर'चं गूढ गुलदस्त्यातच; प्रेक्षकांची उत्सुकता कायम

दरम्यान, ‘मांजर’ या नावामागचं नेमकं गूढ काय, याबद्दल मात्र कलाकारांनी कोणताही खुलासा केला नाही. मांजराचा या चार मित्रांच्या आयुष्यात नेमका काय संबंध आहे, याचं उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळेल, असं सांगत त्यांनी ही उत्सुकता कायम ठेवली.

चित्रपटाचा ट्रेलर पाहा

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल; कलाकारांना विश्वास

'मांजर' हा केवळ तरुणांसाठीचा चित्रपट नसून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल, असा विश्वासही कलाकारांनी व्यक्त केला. चित्रपटाच्या सेटवर ज्या पद्धतीने सगळ्यांनी कामाचा आनंद घेतला, त्याचप्रमाणे प्रेक्षकांनीही हा चित्रपट एन्जॉय करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आता 'मांजर' नेमकं काय आहे, या प्रश्नाचं उत्तर कलाकारांनी गुलदस्त्यातच ठेवलं आहे. त्यामुळे या गोंधळामागचं रहस्य काय, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना १८ सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Navi Mumbai : महापालिका पदभरती निकालाचा मार्ग मोकळा; संवर्गाचे स्कोअर कार्ड संकेतस्थळावर होणार जाहीर

Thane : खारफुटीतील भराव तात्काळ थांबवा! पोलीस आयुक्तांना NGT चा दणका, जिल्हाधिकाऱ्यांनाही फटकारले

Ulhasnagar : 'मी आमदार आहे, नगरसेवकाला विचारण्याची गरज नाही'; गोलमैदानातील विकासकामावरून आयलानी-पांडे आमनेसामने

Thane : गणेशोत्सवात अवजड वाहनांना 'नो एंट्री' विसर्जनाच्या पाच दिवसांत शहरात प्रवेशबंदी