मनोरंजन

शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाची जंगी घोषणा

महाराष्ट्रभर होणार संमेलन

नवशक्ती Web Desk

शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्ब्बर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा.श्री. शरद पवार व मुख्य निमंत्रक मा.ना.श्री. उदय सामंत आहेत.

तंजावर येथे ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. प्रेमानंद गज्वी व नाट्य परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत नाट्य संहिता पूजन व नटराज पूजन होणार आहे. यानंतर नाट्य संमेलनाच्या सोहळ्याची मुहूर्तमेढ कार्यक्रम सांगली येथे दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे.

शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी पुणे येथे सुरु होऊन समारोप मे २०२४ अखेर रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. उद्घाटन सोहळा ते समारोप या कालावधीत अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर आणि मुंबई येथे विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहे.

दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ पुणे येथे संपन्न होणार असून दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी पिंपरी-चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. तसेच दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध शाखा व कलावंत सहभागी होणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या १०० व्या नाट्य संमेलनास रसिक आणि रंगकर्मींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांनी केले आहे.

गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय; ३१ ऑक्टोबरपर्यंत ४ प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी

मतदार यादी गैरव्यवहार आरोप : चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

राज्यात बुधवारपासून वादळी पावसाचा अंदाज; हवामान विभागाची माहिती

खड्ड्यांमुळे मृत्यू वा जखमी झालेल्यांना नुकसानभरपाई द्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

सोसायटी पुनर्विकासात विकासक निवडीसाठी निविदा अनिवार्य नाही; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा