मनोरंजन

Marathi Serial: आगळीवेगळी लव्ह स्टोरी घेऊन 'अंतरपाट' १० जून पासून येतोय प्रेक्षकांच्या भेटीस

Tejashree Gaikwad

Marathi Serial Update: महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘कलर्स मराठी’चे प्रोग्रामिंग हेड म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर रसिकांच्या भेटीला नवनवीन मालिका येतच आहेत.

'अबीर गुलाल' या नव्या मालिकेसोबत आता 'अंतरपाट' ही नवीन मालिका १० जून पासून संध्याकाळी ७:३० वाजता रसिकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांआधी या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून, त्यात हळदीचा समारंभ सुरू असल्याचे दिसत होते. लव्ह मॅरेजच्या काळात अरेन्ज मॅरेज करणाऱ्या गौतमीला परफेक्ट जोडीदार मिळाल्याने ती अतिशय आनंदी आहे. गौतमीला आपल्या जोडीदारासोबत प्रत्येक स्वप्नं पूर्ण करायचे आहे. गौतमीला वाटतेय की, क्षितिज हा सर्वोत्तम आणि परिपूर्ण असा नवरा आहे, जसा तिला हवा होता, अगदी तसा.

आता या मालिकेचा अजून एक नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात तुम्ही पाहू शकता की, उल्हासित, आनंदी वातावरण, लग्नाची लगबग, सजलेला मंडप, पाहुण्यांचा सगळीकडे वावर दिसत आहे. गौतमी मंडपाकडे चालत येत असताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात आहे. तसेच मंडपात क्षितिजच्या मनात भलतीच घालमेल सुरु असल्याचे देखील दिसत आहे. सनई चौघडण्याच्या सुरामध्ये दोघांनी ही एकमेकांना वरमाळा घातल्या. सगळीकडे आनंदाचे वातावरण असतानाच,क्षितिज गौतमीला बोलतो की, मी एक तुझ्याकडे गोष्ट मागू का? गौतमी हसून म्हणते हो आणि मग क्षितिज तिच्या कडून घटस्फोट मागतो. काय असेल क्षितीजच्या मनात? लग्नाच्या शुभ प्रसंगी का आणि कशासाठी असे टोकाचे पाऊल उचलले असेल? काय लिहिले आहे गौतमीच्या नशिबात? नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने धरला दुराव्याचा अंतरपाट!

या मालिकेचा प्रोमो तुम्ही कलर्स मराठीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर देखील पाहू शकता. तसेच 'अंतरपाट' या मालिकेत अशोक ढगे, रश्मी अनपट, रेशम टिपणीस या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही गोष्ट नेमकी काय असणार, याची प्रेक्षकांना खूपच उत्सुकता लागली आहे. 'अंतरपाट' ही मालिका १० जून पासून संध्याकाळी ७: ३० वाजता कलर्स मराठीवर आणि #JioCinema वर रसिकांना भेटायला येणार आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त