मनोरंजन

"पत्नीला घरात बंद करून..." नवाजुद्दीन सिद्दीकीवर पत्नीच्या वकिलाने केले गंभीर आरोप

बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकी आता वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे

प्रतिनिधी

बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने ठसा उमटवणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकी आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दकीच्या आईने त्याच्या पत्नीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. यावरून आता त्याच्या पत्नीने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकीवर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या वकिलाने सांगितले की, "नवाजुद्दीन सिद्दकी त्याची पत्नी आलिया खोलीमध्ये डांबून ठेवले होते. तसेच, नवाझ आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला जबरदस्ती घराबाहेर काढण्याचे प्रयत्न केले."

आलियाचे वकील म्हणाले की, "आधी तिला घराबाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. त्यानंतर तिच्या विरोधात तक्रार दाखल करून तिला अटक करण्याची धमकी दिली. नवाझच्या कुटुंबीयांनी आलियाच्या छळ केला आहे. गेल्या ७ दिवसांपासून तिला जेवण दिलेले नाही. झोपायला बेड आणि अंघोळीसाठी बाथरूमही वापरून दिले नाही. तिच्या खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावून खोलीबाहेर २४ तास बॉडीगार्ड ठेवण्यात आला होता." पुढे ते म्हणाले की, " अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकी आणि त्याच्या कुटुंबीयांनी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना आलियाला भेटता येणार नाही, यासाठीही प्रयत्न केले. तरीही आम्ही कसेबसे तिच्या सह्या मिळवल्या. आता आम्ही त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहोत." असे गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस