मनोरंजन

ऐतिहासिक चित्रपटात दिसणार 'रामशेज'ची लढाई

शिवराज्याभिषेकदिनाच्या मुहूर्तावर पोस्टर प्रदर्शित

नवशक्ती Web Desk

३५० व्या शिवराज्याभिषेकदिनाचे औचित्य साधत 'आलमंड्स क्रिएशन्स प्रोडक्शन'ने 'रामशेज' या भव्यदिव्य ऐतिहासिक मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतही मंडळी प्रखर निष्ठेने मोगली सत्तेशी झुंजत राहिली. त्यांच्या तेजस्वी पराक्रमाची दुर्लक्षित गाथा म्हणजे नाशिक नजीकच्या 'रामशेज' किल्ल्याची लढाई. 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड'च्या यशानंतर आणि 'मुरारबाजी' चित्रपटाचे चित्रीकरण जोमात सुरु असतानाच निर्माते अजय आरेकर आणि अनिरूद्ध आरेकर आपल्या 'आलमंड्स क्रिएशन्स'द्वारा 'रामशेज' ही चौथी कलाकृती शिवप्रेमींसाठी घेऊन येत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रातील किल्ले जिंकून आपली सल्तनत बुलंद करण्याचा मनसुबा बोलून दाखवला आणि त्याची पहिली नजर पडली ‘रामशेज’ किल्ल्यावर पण हा किल्ला सर करायला त्याला एक नाही.. दोन नाही.. तब्बल साडे सहा वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही किल्ला जिंकता आला नाही. केवळ ६०० मावळ्यांनी हा किल्ला प्राणपणाने जपला; तो हस्तगत करण्यासाठी शहाबुद्दीन खान, फतेह खान आणि कासम खान यांसारख्या मातब्बर सरदारांनी अक्षरशः शर्थ केली पण हाती केवळ निराशा आली. त्या ६०० मावळ्यांच्या शौर्याची, चिकाटीची आणि बुद्धिचातुर्याची चित्तथरारक गोष्ट म्हणजे 'रामशेज'.

लवकरच 'रामशेज' चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.या चित्रपटात अंकित मोहन आणि हरीश दुधाडे हे कलाकार आहेत. बाकीची नावं अद्याप गुलदस्त्यात आहेत.

Iran vs US-Israel War : ट्रम्प यांचा पुन्हा 'हल्लाबोल'; लवकर शांतता तह करा, अन्यथा, 'उद्ध्वस्त' करू- इराणला इशारा

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी सरी; पुणे, पिंपरी - चिंचवड, वाशिममध्ये पाऊस; वातावरणात गारवा, पण शेतीचे नुकसान

सुनेत्रा पवारांचा भाजपला दणका; पालकमंत्री होताच पुण्यातील महत्त्वाचे कार्यालय बारामतीला हलवले

SIT चौकशीला रुपाली चाकणकरांची दांडी

संभाजीनगरात LPG टंचाई; दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा संप; प्रवाशांचे हाल