प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानींचे निधन  (Photo-X)
मनोरंजन

प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानींचे निधन

प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी (वय ७१) यांचे गुरुवारी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Swapnil S

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी (वय ७१) यांचे गुरुवारी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निहलानी यांनी १९८२ मध्ये 'हथकडी' या सिनेमाद्वारे निर्माता म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 'आँखे', 'अंदाज', 'शोला और शबनम', 'तलाश', 'रंगीला राजा' आणि 'ज्युली 2' यांसारखे अनेक हिट सिनेमे दिले. २०१५ ते २०१७ या कालावधीत सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते.

अनेक अभिनेत्यांच्या कारकीर्दीत पहलाज निहलानी यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी १९८६ मध्ये 'इल्झाम' या सिनेमाद्वारे गोविंदाला सिनेसृष्टीत लाँच केले आणि त्यानंतर 'आग ही आग' या सिनेमाद्वारे चंकी पांडेला या क्षेत्रात आणले.

पुढे, पहलाज निहलानी यांनी गोविंदा आणि चंकी पांडे यांची प्रमुख भूमिका असलेला 'आँखे' या सिनेमाची निर्मिती केलेली. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक ठरला.

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण

साखर कारखान्यांना ७३८ कोटींचे व्याज अनुदान; सहकारी साखर कारखान्यांसाठी सुलभ कर्ज योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : शंख-शिंपल्यांपासून साकारली ९.५ फुटांची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती; मालाडच्या श्री साई दर्शन मित्रमंडळाचे १७ व्या वर्षात पदार्पण