पुणे-नागपूर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; पुलाच्या कठड्याला धडकून बस नाल्यात, प्रवाशांना काचा फोडून बाहेर काढलं, एकाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Bus Accident : छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर पुणे-नागपूर ट्रॅव्हल्स बस २० फूट खोल नाल्यात कोसळली. अपघातात एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले.
पुणे-नागपूर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; पुलाच्या कठड्याला धडकून बस नाल्यात, प्रवाशांना काचा फोडून बाहेर काढलं, एकाचा मृत्यू
पुणे-नागपूर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; पुलाच्या कठड्याला धडकून बस नाल्यात, प्रवाशांना काचा फोडून बाहेर काढलं, एकाचा मृत्यू
Published on: 

छत्रपती संभाजीनगर : पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा शनिवारी (दि. १४) पहाटे भीषण अपघात झाला. छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर धावणाऱ्या या बसने पुलाच्या कठड्याला धडक दिली आणि थेट २० फूट खोल नाल्यात कोसळली. या अपघातात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं.

पुलाच्या कठड्याला धडक अन् बस नाल्यात कोसळली

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्याहून नागपूरच्या दिशेने जाणारी खासगी स्लीपर ट्रॅव्हल्स शनिवारी पहाटे छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरून जात होती. यावेळी बसने पुलाच्या कठड्याला धडक दिली. या धडकेनंतर बस थेट सुमारे २० फूट खोल नाल्यात कोसळली.

बस नाल्यात कोसळल्याने अनेक प्रवासी आत अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बसच्या काचा फोडून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं. त्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं.

पुणे-नागपूर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; पुलाच्या कठड्याला धडकून बस नाल्यात, प्रवाशांना काचा फोडून बाहेर काढलं, एकाचा मृत्यू
Mumbai : कोस्टल रोडवरील बोगद्यात ६ वाहनांचा विचित्र अपघात; धडकेनंतर SUV ने घेतला पेट

२५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

या बसमध्ये २६ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातात एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, उर्वरित प्रवाशांपैकी अनेक जण जखमी झाले आहेत. एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

मृत तरुणाची ओळख अद्याप पूर्णपणे पटलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, त्याचं नाव साई असून, तो कामगार होता. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

चिकलठाणा पोलीस ठाण्यातील सतीश देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मृत तरुणाच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. त्यांच्या माध्यमातून कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली असून, नातेवाईक आल्यानंतर मृताची संपूर्ण ओळख स्पष्ट होणार आहे.

पुणे-नागपूर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; पुलाच्या कठड्याला धडकून बस नाल्यात, प्रवाशांना काचा फोडून बाहेर काढलं, एकाचा मृत्यू
Jalgaon Earthquake : जळगावमध्ये भूकंपाचा धक्का! रावेर, भुसावळसह अनेक तालुके हादरले; हतनूर धरण परिसरातही हादरा

अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी

छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. अपघातानंतर या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी काही वाहनं पर्यायी मार्गाने वळवली. तसेच एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.

दोन क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढली

नाल्यात कोसळलेली अपघातग्रस्त बस बाहेर काढण्यासाठी दोन क्रेन मागवण्यात आल्या. त्यांच्या मदतीने बस नाल्यातून बाहेर काढण्यात आली. अपघातामुळे पुलाच्या कठड्याचे तुकडे आणि इतर साहित्य रस्त्यावर विखुरलं होतं. पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून हा मलबा बाजूला केला. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)