मनोरंजन

Pathaan Controversy : 'पठाण' चित्रपटातील 'या' दृशांना कात्री, बेशरम रंग गाण्यामध्ये केले बदल!

सेन्सॉर बोर्डाने पठाण चित्रपटामध्ये (Pathaan Controversy) अनेक बदल सुचवले असून आता काही वादग्रस्त भाग या चित्रपटामध्ये दिसणार नाहीत

प्रतिनिधी

'पठाण'चा (Pathaan Controversy) वाद सुरु असताना आता सेन्सॉर बोर्डाने (Censor Board) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सुचवलेल्या बदलांची यादी समोर आली असून आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कोणताही वाद होणार नाही, याची काळजी घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याची प्रचिती केलेल्या बदलांवरूनच येते. अद्याप अधिकृतरीत्या याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

बेशरम रंग गाण्यामध्ये केले हे महत्त्वाचे बदल:

> 'बेशरम रंग'मध्ये दीपिकाच्या शरीराचे काही क्लोज-अप शॉट्स काढण्यात आले.

> गाण्यातील 'बहुत तंग किया' या गाण्यांसोबत असलेले काही आक्षेपार्ह्य दृश्य काढून टाकण्यात आले आहेत. त्याजागी इतर शॉट्स वापरण्यात आले.

> 'बेशरम रंग'मधून दीपिकाची साइड पोजही काढून टाकण्यात आली.

संपूर्ण चित्रपटामध्ये सुचवले हे बदल:

> चित्रपटातील संवादांमध्ये 'अशोक चक्र' हा शब्द बदलून 'वीर पुरस्कार' करण्यात आला

> संवादामध्ये 'RAW ' हा शब्द काढून त्याऐवजी 'हमारे' हा शब्द वापरण्यात येणार आहे

> एका ठिकाणी 'मिसेस भारत माता' असा उल्लेख होता, त्याऐवजी 'हमारी भारत माता' असा संवाद केला.

> चित्रपटामध्ये तब्बल १३ ठिकाणी 'पीएमओ' या शब्दांचा वापर केला होता, त्याऐवजी आता 'मंत्री किंवा राष्ट्रपती' असा शब्द वापरण्यात येईल.

> एका ठिकाणी केजीबीचा उल्लेख करण्यात आला आहे. तोही बदलून एसबीयू वापरण्याची सूचना दिली आहे.

> 'लंगडे-लुले' हा शब्द बदलून 'तुटे-फुटे' असा करण्यात आला.

> एवढंच नव्हे तर 'स्कॉच' शब्दाऐवजी 'ड्रिंक' हा शब्द वापरला जाणार आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश