Thane : ठाणेकरांना मिळणार काशीचा अनुभव; नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलावपाळीवर गंगा आरतीचे आयोजन

नववर्षाच्या स्वागतासाठी ठाण्यात तलावपाळीवर ३१ डिसेंबरच्या रात्री खास गंगा आरतीचे आयोजन केले आहे. या आरतीसाठी वाराणसीहून पंडितांना आमंत्रित करण्यात आले आहे.
Thane : ठाणेकरांना मिळणार काशीचा अनुभव; नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलावपाळीवर गंगा आरतीचे आयोजन
Thane : ठाणेकरांना मिळणार काशीचा अनुभव; नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलावपाळीवर गंगा आरतीचे आयोजन
Published on

नववर्षाच्या स्वागतासाठी यंदा ठाणेकरांना एक वेगळा आणि आध्यात्मिक अनुभव मिळणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री ठाण्यातील ऐतिहासिक तलावपाळी परिसरात खास गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच, नववर्षाचे स्वागत भक्तीमय वातावरणात करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

सामान्यतः गुढीपाडवा, दिवाळी अशा सणांच्याप्रसंगी तलावपाळी येथे दीपोत्सव व गंगा आरतीचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा प्रथमच नववर्षाच्या पूर्वसंध्येला (३१ डिसेंबर) गंगा आरती होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही आरती रात्री १०.३० वाजता सुरू होऊन १२.०१ वाजेपर्यंत सुरु असणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आले आहे. ही ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहरात सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम राबवत आहे.

वाराणसीहून येणार अनुभवी पंडित

या विशेष गंगा आरतीसाठी वाराणसी येथील अनुभवी पंडितांना खास निमंत्रित करण्यात आले आहे. पारंपरिक विधी, मंत्रोच्चार आणि आरतीच्या माध्यमातून ठाणेकरांना काशी-हरिद्वारसारखा आध्यात्मिक अनुभव देण्याचा आयोजकांचा मानस आहे. तलावपाळी परिसरात यामुळे भक्तीमय आणि शांत वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर FDA कडून धडक कारवाई

दरम्यान, ख्रिसमस आणि नववर्षाच्या सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या विक्रीत वाढ होत असल्याने राज्याचा अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) सतर्क झाला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांसह नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर जेवण आणि केक-मिठाई खरेदी करतात. याची दखल घेत FDA कडून तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, "नागरिकांना सणासुदीच्या काळात भेसळमुक्त आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट्स, बेकरी, मिठाई दुकाने तसेच ख्रिसमस व नववर्षासाठी केक, स्नॅक्स तयार करणाऱ्या आस्थापनांची तपासणी केली जाणार आहे."

FDA अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, "अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन होते की नाही, यावर विशेष लक्ष ठेवले जाणार असून नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल."

logo
marathi.freepressjournal.in