Bigg Boss Marathi 6 : ‘घटस्फोटाचा मुद्दा काढत मर्यादा ओलांडल्या... कारवाई करा’; राकेश-विशालच्या हाणामारीवर बापट कुटुंबीयांचा संताप 
मनोरंजन

Bigg Boss Marathi 6 : ‘घटस्फोटाचा मुद्दा काढत मर्यादा ओलांडल्या...राकेश-विशालच्या हाणामारीवर बापट कुटुंबीयांचा संताप; कारवाईची मागणी

‘बिग बॉस मराठी ६’मध्ये नॉमिनेशन टास्कदरम्यान राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यातील वाद चिघळत हाणामारीपर्यंत पोहोचला. खासगी गोष्टी उकरून काढत मर्यादा ओलांडल्याचा आरोप करत बापट कुटुंबीयांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Mayuri Gawade

'बिग बॉस मराठी ६’मध्ये नॉमिनेशन टास्कदरम्यान राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यात झालेला वाद चांगलाच चिघळला असून या प्रकरणावर आता राकेश बापट यांच्या कुटुंबीयांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबीयांनी विशाल कोटियन यांच्या वर्तनाचा तीव्र निषेध नोंदवत गंभीर आरोप केले आहेत.

नॉमिनेशन टास्कदरम्यान काय घडलं?

नॉमिनेशन टास्कदरम्यान स्पर्धकांना एकमेकांना नॉमिनेट करत त्यांच्या ‘टीव्ही’वर प्रहार करायचा होता. यावेळी राकेश बापट यांनी विशाल कोटियन यांचे नाव घेत त्यांच्या वागण्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला.

या वादादरम्यान विशाल यांनी राकेश यांच्या वैयक्तिक आयुष्याचा, विशेषतः घटस्फोटाचा मुद्दा काढत टोमणा मारला. त्यामुळे वातावरण अधिकच तापले आणि काही क्षणातच हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने बिग बॉसला हस्तक्षेप करावा लागला.

कुटुंबीयांचा गंभीर आरोप

या घटनेनंतर राकेश बापट यांच्या कुटुंबीयांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत विशाल कोटियन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, विशाल यांनी वारंवार इतर स्पर्धकांच्या वैयक्तिक बाबी उकरून काढल्या, जे शोच्या नियमांचा स्पष्ट भंग आहे.

बिग बॉसच्या नियमांनुसार घराबाहेरील वैयक्तिक मुद्द्यांवर चर्चा करणे किंवा त्यावरून कोणाला लक्ष्य करणे सक्त मनाई आहे. अशा उल्लंघनासाठी शोमधून बाहेर काढण्यासारखी कठोर कारवाई होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

नियमभंगाकडे दुर्लक्ष?

कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, शोच्या सुरुवातीपासूनच विशाल यांची ही प्रवृत्ती दिसत होती आणि यावेळी हा प्रकार सर्व मर्यादा ओलांडणारा ठरला. हा वाद केवळ शाब्दिक न राहता हेतुपुरस्सर शारीरिक चिथावणी देत परिस्थिती आक्रमकतेपर्यंत नेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

तसेच, शोमध्ये झालेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत शारीरिक आक्रमकतेवर किरकोळ कारवाई करण्यात आली, मात्र वैयक्तिक बाबी उकरून काढण्याच्या गंभीर उल्लंघनाकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राकेशच्या वागणुकीचा उल्लेख

निवेदनात कुटुंबीयांनी राकेश बापट यांच्या वागणुकीचाही उल्लेख करत त्यांनी संपूर्ण प्रवासात संयम, सन्मान आणि प्रतिष्ठा जपली असल्याचे सांगितले. घराबाहेरील वैयक्तिक बाबींवरून त्यांनी कधीही कोणाला लक्ष्य केले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

कारवाईची मागणी

शोचे सूत्रसंचालक रितेश देशमुख यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. तसेच ‘बिग बॉस मराठी’, ‘कलर्स’ आणि ‘एंडेमॉलशाइन’ यांनी शोची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी योग्य पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे कुटुंबीयांसह राकेशचे चाहतेही नाराज असून, “आम्ही अत्यंत व्यथित आणि निराश आहोत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

५० हजारांवरील व्याजावर TDS कपात; ज्येष्ठ नागरिकांसाठी १ लाखपर्यंत सवलत

Mumbai : 'मेट्रो वुमन' अश्विनी भिडे बनल्या पहिल्या महिला BMCआयुक्त; आज पदभार स्वीकारणार

"लोक एकमेकांवर पडत होते..." बिहारमध्ये शीतला मंदिरात भीषण चेंगराचेंगरी; ८ महिलांचा मृत्यू, अनेक जखमी; Video

'रेडी रेकनर' दरवाढ माफक राहणार?­ महागाई व जागतिक अनिश्चिततेचा परिणाम

कर्जतमध्ये मिरचीचे दर दुप्पट; गृहिणींना महागाईचा ठसका; परदेशात मसाल्यांची निर्यात