PM
मनोरंजन

सारा अली खानच्या 'ऐ वतन मेरे वतन' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी होणार रिलीज

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान तिच्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत आली आहे

Swapnil S

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान तिच्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत आली आहे. साराचा 'ऐ वतन मेरे वतन' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झाले आणि आज या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

कधी रिलीज होणार चित्रपट?

"देश की कहानी, उषा की जुबानी, विश्व रेडियो दिवस पर! 'ऐ वतन मेरे वतन' हा चित्रपट अॅमेजॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २१ मार्चला रिलीज होणार आहे", असे साराने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे. साराने शेअर केलेल्या पोस्टरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा चांगलाच वर्षाव केला आहे.

हे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका-

सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, एलेक्स नील आणि आनंद तिवारी हे कलाकार 'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. याशिवाय इमरान हाशमी या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून काम करणार आहे. करण जौहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

आंदोलनामुळे हॉटेल, दुकाने बंद; आंदोलकांची झाली गैरसोय, सोबत १५ दिवसांची शिदोरी...

CSMT टाळण्याचे प्रवाशांना रेल्वेचे आवाहन; मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबई ठप्प