तमिळ संगीतकार देवा यांचे निधन; ४०० हून अधिक चित्रपटांना संगीत (Photo-X)
मनोरंजन

तमिळ संगीतकार देवा यांचे निधन; ४०० हून अधिक चित्रपटांना संगीत

Tamil Music Composer Deva Passes Away : तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार देवा यांचे शनिवारी चेन्नई येथे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.

Swapnil S

चेन्नई : तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार देवा यांचे शनिवारी चेन्नई येथे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

तमिळ 'गाना' संगीतशैलीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेणारे आणि रजनीकांत, कमल हासन, विजय, अजित कुमार यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्यांच्या चित्रपटांना अनेक लोकप्रिय गाणी देणारे संगीतकार म्हणून त्यांची ओळख होती.

चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले. देवा यांचे तमिळ भाषिक जनतेला दिलेले सर्वांत मोठे योगदान म्हणजे 'गाना' संगीतशैली. कामगारवर्गातील जीवनशैली, त्यांच्या आवडीनिवडी, तरुणाईच्या जगण्याचे प्रतिबिंब या संगीतात उमटते.

बोलीभाषेतील तमिळ शब्दांचा प्रभावी वापर आणि सामान्य माणसाच्या भावविश्वाशी असलेली जवळीक यामुळे देवा यांना या संगीतशैलीचे जनक म्हणून लोकप्रियता मिळाली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू

Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद

घटनादुरुस्ती विधेयकावर घाईने निर्णय नको; खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र, सीमांकन प्रस्तावांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी

५ हजारांचे मूल्य कसे समजणार? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

Mumbai : पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय; दुर्गामूर्तीचे फोटो, व्हिडीओ काढण्यास मनाई