मनोरंजन

Tanaav 2: स्‍पेशल टास्‍क फोर्ससह कबीर फारूकीचे पुनरागमन, ‘तनाव २' लवकर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Tejashree Gaikwad

Web Series: तनाव या हिट वेब सीरिजचा पहिला सीझन २०२२ मध्ये रिलीज झाला होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. तेव्हापासून त्याच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा होती. रोमांचक सिरीज ‘तनाव'चे सीझन २ सह पुनरागमन आणि यावेळी अधिक रोचक असणार आहे. ही सिरीज अॅक्‍शन-पॅक कथानकासोबत शौर्य, फसवणूक, लोभ, प्रेम आणि सूडाच्‍या कथांचे एकत्रित सादर करते. यावेळी, कबीर आणि स्‍पेशल टास्‍क फोर्स (एसटीजी) नवीन धोक्‍याचा सामना करणार आहेत. सूड घेण्याच्या विचाराने एक तरूण काश्‍मीरमध्‍ये येतो. यापासून एसटीजी काश्‍मीरच्‍या सामान्‍य लोकांना वाचवू शकतील का? हे ‘तनाव २'मध्ये बघायला मिळणार आहे.

ट्रेलरमध्ये दिसून येत आहे की फरीद मीर नावाचा एक मुलगा सीरियातून आला आहे जो खोऱ्यात काहीतरी मोठे करण्याचा कट ISIS सोबत रचत आहे. मग एक स्फोट घडवून आणला जातो जिथे सामान्य लोकच नाही तर सैनिक देखील उपस्थित असतात. याच सोबत ही कथा पुढे जाते. या सिजनमध्ये आधीच्या सिजनपेक्षा यावेळी अधिक तणाव आणि ॲक्शनने भरलेले वातावरण असणार आहे, हे ट्रेलरवरून स्पष्ट झाले आहे.

कोण कलाकार बघायला मिळणार?

अ‍ॅप्‍लॉज एंटरटेन्‍मेंटद्वारे निर्मित ‘तनाव' इस्राईलची सिरीज ‘फोदा'ची ऑफिशियल रिमेक आहे. अवी इस्‍साचारोफ व लियोर राज यांची निर्मिती आणि येस स्‍टुडिओजद्वारे वितरित या सिरीजचे दिग्‍दर्शक पुरस्‍कार-विजेते सुधीर मिश्रा आणि ई. निवास आहेत. सिरीज ‘तनाव २'मध्‍ये मानव विज (Manav Vij), गौरव अरोरा (Gaurav Arora) , अरबाज खान (Arbaaz Khan) , सत्‍यदीप मिश्रा, रजत कपूर, सुखमणी सदाना, साहिबा बाली, अर्सलन गोनी, अमित गौड, एकता कौल आणि वालुशा डीसूजा आहेत, जे सिरीजमध्‍ये पुनरागमन करत आहेत. यामुळे ही सिरीज पाहण्‍यास एक पर्वणी असणार आहे.

कधी बघायला मिळणार सिरीज?

‘तनाव २' ६ सप्‍टेंबरपासून फक्‍त सोनी लिव्‍हवर बघायला मिळणार आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा