मनोरंजन

Tmkoc Gurucharan Singh Missing: तारक मेहताच्या सोढीने स्वतःला गायब करण्याचा कट रचला होता का?

Tejashree Gaikwad

Roshan Singh Sodhi Missing: तारक मेहता का उल्टा चष्मा हा एक टीव्ही शो बऱ्याच काळापासून लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. या शो मधील रोशन सिंग सोढीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता गुरचरण सिंग सध्या ११ दिवसांपासून बेपत्ता आहे. कुटुंबीय ते त्यांचे चाहतेही यामुळे चिंतेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत मात्र अद्यापपर्यंत गुरुचरण सिंग यांच्याबाबत ठोस अशी कोणतेही अपडेट मिळालेली नाही. गुरचरणच्या बेपत्ता होण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आता या केसमध्ये एक नवीन थेअरी समोर आली आहे. याला तुम्ही या केसचे नवीन अपडेट देखील म्हणू शकता. मात्र हा पोलिसांचा अंदाज आहे.

काय आहे अपडेट?

२२ रोजी सायंकाळपासून तो बेपत्ता झाला आहे. न्यूज १८ च्या वृत्तानुसार, गुरचरण सिंगने स्वतःच बेपत्ता होण्याचे नियोजन केले आहे. त्याने आपला फोन पालममध्ये सोडला आणि त्यानंतर तो दिल्लीबाहेर गेला. पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र आता मिळालेल्या माहितीमुळे पोलिसांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण गुरुचरणला फोनद्वारे सहज शोधता आले असते. मात्र आता या अभिनेत्याकडे फोन नसल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत त्यांना शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरू शकते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, तो एका रिक्षातून दुसऱ्या रिक्षात जाताना दिसत होता. हे सर्व दुवे जोडून गुरुचरण यांनी पूर्ण नियोजन करून हे काम केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अभिनेत्याला मुंबईत येण्यास भाग पाडले

अभिनेता गुरचरण सिंग तोही मजबुरीतून मुंबईत आला. गुरुचरण सिंहने त्यांच्या एका लाइव्ह व्हिडीओमध्ये सांगितले होते की, त्यांच्या डोक्यावर खूप कर्ज असताना तो मुंबईत आला होता. पैसे परत मिळवण्यासाठी लोक त्याचा पाठलाग करायचे. जेव्हा तो मुंबईला गेला आणि सहा महिन्यांतच त्याला तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये भूमिका मिळाली. गुरचरण सिंहने २०१३ मध्ये शो सोडला. पण लोकांच्या डिमांडनुसार, तो २०१४ मध्ये शोमध्ये परत आला. त्यानंतर सहा वर्षे काम केल्यानंतर गुरुचरण यांनी २०२० मध्ये शोला अलविदा केला.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस