मनोरंजन

Zee Marathi: 'झी मराठी' नवीन अवतारत प्रेक्षकांच्या भेटीला!

प्रेक्षकांच्या बदलत्या पसंतीसह झी मराठीने आजच्या सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील अश्या नवीन कथा आणल्या आहेत.

Tejashree Gaikwad

झी मराठीने आजवर प्रेक्षकांच्या कौटुंबिक भावना, प्रेम, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची संस्कृती जपली आहे आणि हे नातं आणखी दृढ करण्यासाठी झी मराठी २७ मे २०२४ पासून एका नवीन रूपात प्रेक्षकांसमोर आली. पुन्हा एकदा झी मराठी प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करण्यासाठी आणि चाफ्याचा सुगंध पसरवण्यासाठी सज्ज आहे. प्रेक्षकांच्या बदलत्या पसंतीसह झी मराठीने आजच्या सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील अश्या नवीन कथा आणल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत, 'जाऊ बाई गावात' सारख्या नाविन्यपूर्ण रिऍलिटी शोमुळे प्रेक्षकांच्या संख्येत वाढ झाली. त्यात भर टाकली ती 'पारू', 'शिवा', 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'पुन्हा कर्तव्य आहे ' या नवीन मालिकांनी. लक्षवेधक कथा, आकर्षक सेट, उत्तम निर्मितीमूल्य, उत्तम कलाकारांची फौज या सर्वांमुळे प्रेक्षकांना ह्या मालिका आपल्या वाटू लागल्या आहेत. या सर्व मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे, सर्वत्र क्रिकेटचं वातावरण असतानाही, झी मराठीने आपली यशस्वी घौडदौड सुरूच ठेवलीये आणि क्रिकेटच्या मॅचेसना प्रेम मिळत असतानाही याकाळात झी मराठीलाही प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळालं.

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलवादी? विधानसभेत आमदार मनीषा कायंदे काय म्हणाल्या? बघा Video

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल