एक्स @sanjoychakra
आंतरराष्ट्रीय

पाकमध्ये दहशतवादी हल्ल्यात १२ ठार

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात घडविण्यात आलेल्या दोन बॉम्बस्फोटांच्या घटनेत १२ जण ठार, तर ३० जण जखमी झाले आहेत.

Swapnil S

पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात घडविण्यात आलेल्या दोन बॉम्बस्फोटांच्या घटनेत १२ जण ठार, तर ३० जण जखमी झाले आहेत. हा पूर्वनियोजित दहशतवादी हल्ला होता, अशी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि हल्लेखोर यांच्यात चकमकही झाली. या दहशतवादी हल्ल्यामागे ‘जैश उल फुरसान’ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची चर्चा आहे.

दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी दोन कारबॉम्बचा उपयोग केला. सुरक्षा दलांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी हे केले. दहशतवाद्यांनी इफ्तारनंतर बन्नू केंट या ठिकाणी असलेल्या सुरक्षा कड्यावर हल्ला केला. हल्ला करणारे सहा ते सात दहशतवादी होते, अशीही माहिती समोर आली आहे. याआधी सोमवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात एका महिला आत्मघातकी हल्लेखोराने हल्ला केला होता. पॅरामिलिट्री फ्रंटियर कोअरवर हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात एका सैनिकाचा मृत्यू झाला.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती