मोदींच्या AI व्हिडिओने राजकारण तापले; भाजपचा काँग्रेसवर पलटवार, "नामदार काँग्रेसला एका कामदार पंतप्रधानाचा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एआय व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या महिला नेत्याने पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेयर केला आहे. त्यावरून राजकरण पेटले आहे.
मोदींच्या AI व्हिडिओने राजकारण तापले; भाजपचा काँग्रेसवर पलटवार, "नामदार काँग्रेसला एका कामदार पंतप्रधानाचा...
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एआय व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या महिला नेत्याने पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेयर केला आहे. सध्या हा एआय व्हिडीओ चर्चेत आला असून त्यावरून भाजप विरुद्ध काँग्रेस अशी खडाजंगी रंगली आहे. "नामदार काँग्रेसला एका कामदार पंतप्रधानाचा हेवा का?" असा सवाल भाजप नेत्याने उपस्थित केला आहे.

नेमकं काय घडलं?

काँग्रेस नेत्या रागिणी नायक यांनी X च्या माध्यमातून एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या एका हातात चहाची किटली आहे तर दुसऱ्या हातात काचेचे ग्लास दाखवण्यात आले आहेत. तसेच, या व्हिडिओमध्ये 'चहा घ्या चहा' असे ओरडताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेस नेत्या रागिणी नायक यांनी व्हिडीओसोबत एक कॅप्शन लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, 'आता हे कोणी केले?' त्यांनी शेयर केलेला व्हिडीओ बराच व्हायरल झाला असून या व्हिडीओमुळे आता राजकीय विश्वातून प्रतिक्रिया येत आहेत.

गुजरातच्या रेल्वे स्टेशनवर मोदी चहा विकायचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशात सत्ता आल्यावर त्यांची एक आठवण सांगितली होती. त्यावेळी ते म्हणाले होते, "गुजरातच्या रेल्वे स्टेशनवर मी चहा विकायचो." या गोष्टीवरून अनेकदा विरोधक टीका करताना दिसून येतात.

'नामदार' काँग्रेसला एका कामदार पंतप्रधानाचा हेवा का?

“रेणुका चौधरी यांनी संसदेला अपमानित केले आणि आता रागिणी नायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चहावाला पार्श्वभूमीची खिल्ली उडवली. 'नामदार' काँग्रेसला एका कामदार आणि गरीब पार्श्वभूमीतून आलेल्या पंतप्रधानाचा एवढा हेवा का? याआधीही त्यांनी त्यांच्या चहावाला ओळखीची टिंगल केली होती. त्यांनी पंतप्रधानांचा १५० वेळा शब्दशः अपमान केला आहे", असे भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे.

याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एआय व्हिडीओ बनवण्यात आला होता. त्यावरूनही राजकीय विश्वात गोंधळ उडाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आलेल्या या व्हिडीओवर अजून कोण काय प्रतिक्रिया देतंय, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in