प्रातिनिधिक छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची हत्या

बांगलादेशात दीपू दास आणि अमृत मंडल यांच्यापाठोपाठ आता मैमनसिंह या आणखी एका हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Swapnil S

ढाका : बांगलादेशात दीपू दास आणि अमृत मंडल यांच्यापाठोपाठ आता मैमनसिंह या आणखी एका हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

येथील कपड्यांच्या गिरणीत ही हत्या झाली. २२ वर्षीय आरोपी नोमन मियाँ याने शॉटगनच्या मदतीने गोळीबार करत ४२ वर्षीय बजेंद्र बिस्वास यांना ठार केले.

येथील कापड गिरणीमध्ये वाद उफाळून आला होता. त्यादरम्यान, २२ वर्षीय नोमन मियाँ याने बजेंद्र बिस्वास याची गोळ्या झाडून हत्या केली. मृत बजेंद्र बिस्वास हा गावाचे रक्षण करणाऱ्या पॅरामिलिट्री ग्रुपचा भाग होता, अशी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कपड्याच्या फॅक्टरीमध्ये हिंसक जमावासमोर त्यांना मारहाण झाली.

यादरम्यान, नोमान मियाँ नावाच्या २२ वर्षीय तरुणाने बजेंद्र बिस्वास याच्यावर शॉटगन ताणली, तसेच जमावासमोरच त्याच्यावर गोळीबार केला. ही गोळी बजेंद्र याच्या डाव्या खांद्यात घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी नोमान मियाँ याला अटक करण्यात आली आहे.

BMC Election 2026 : भाजपकडून १३६ उमेदवार निश्चित; कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार, वाचा सविस्तर

३१ डिसेंबरची हाऊस पार्टी फ्लॉप? 'या' होम डिलिव्हरी ॲप्सचे कामगार संपावर; तुमच्या शहरात डिलिव्हरी चालू की बंद? जाणून घ्या सविस्तर

संभाजीनगर महापालिकेत महायुती तुटली; शिंदे गट आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपांचे वातावरण

Thane Election : परिवहन मंत्री सरनाईक आणि खासदार म्हस्के यांच्या मुलांचे तिकीट कापले

मीरा-भाईंंदरमध्ये भाजप व शिंदे गट स्वबळावर; जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल