कोणाकडून तेल घ्यावे हे तिसरा देश ठरवू शकत नाही; चीनने ठणकावले, अमेरिकेच्या निर्बंध विधेयकाला विरोध (Photo-X)
आंतरराष्ट्रीय

कोणाकडून तेल घ्यावे हे तिसरा देश ठरवू शकत नाही; चीनने ठणकावले, अमेरिकेच्या निर्बंध विधेयकाला विरोध

रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क किंवा निर्बंध लादण्यासाठी अमेरिकेकडून करण्यात येणाऱ्या कारवाईला चीनने गुरुवारी विरोध केला.

Swapnil S

बीजिंग : रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क किंवा निर्बंध लादण्यासाठी अमेरिकेकडून करण्यात येणाऱ्या कारवाईला चीनने गुरुवारी विरोध केला. इतर देशांशी चीनचे नियमित व्यापार आणि आर्थिक सहकार्य हे कोणत्याही तृतीय देशाच्या हस्तक्षेप अथवा दबावाच्या अधीन असू नये, असे चीनने स्पष्ट केले.

या विधेयकाबाबत विचारले असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची मंजुरी नसलेल्या कोणत्याही कारवाईला चीनचा विरोध आहे.

आंतरराष्ट्रीय कायद्याचा आधार नसलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची मंजुरी नसलेल्या ‘लाँग-आर्म ज्युरिस्डिक्शन’ला चीन सातत्याने विरोध करतो, असे गुओ यांनी सांगितले.

चीन जगातील विविध देशांशी समानता आणि परस्पर लाभाच्या तत्त्वावर नियमित आर्थिक आणि व्यापार सहकार्य करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तपासणी, निदान अन् वेळीच उपचार; प्राथमिक ते तृतीयस्तरीय आरोग्यसेवेचे बळकटीकरण, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला ‘प्रगती’चा बूस्टर

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची संगणकाला पसंती; २८ हजार विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सर्वाधिक ६४,८२२ प्रवेश

न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे शांततापूर्ण आंदोलन; समान कामासाठी समान वेतन व उच्च न्यायालयाप्रमाणे वेतनश्रेणी वाढीची मागणी

चंद्रा हवेत, चंद्रा नकोत; टाटा सन्सची मान्यता, टाटा ट्रस्टचा विरोध, शेअर बाजारात नोंदणी प्रक्रिया सुरू करणार