एक्स @ANI
आंतरराष्ट्रीय

शपथविधीच्या पूर्वसंध्येला नीता आणि मुकेश अंबानी यांच्याकडून ट्रम्प यांचे अभिनंदन

अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी (२० जानेवारी) अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.

Swapnil S

मुंबई : अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी (२० जानेवारी) अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, वॉशिंग्टनमधील खासगी रिसेप्शनमध्ये रविवारी रिलायन्सचे इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश आणि नीता अंबानी यांनी त्यांचे अभिनंदन करताना छायाचित्र घेतले. भारत-अमेरिका संबंधांच्या सखोलतेसाठी सामायिक आशावादासह अंबानी यांनी ट्रम्प यांना त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी (२० जानेवारी) शपथ घेणार आहेत. भारताकडून या शपथविधी सोहळ्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे उपस्थित राहणार आहेत.

ट्रम्प यांनी २०१६ ते २०२० दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवले आहे. या शपथविधी सोहळ्याला विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि त्यांचे पती डग एमहॉफ उपस्थित राहतील. इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी, एल साल्वादोरचे राष्ट्रपती नायब बुकेले, हंगेरीहून विक्टर ऑर्बन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि अर्जेंटिनाचे राष्ट्रपती जेवियर माइली उपस्थित राहतील.

ट्रम्प यांच्यासोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी शपथविधी सोहळ्याला उद्योगपतींनी मोठ्या देणग्या दिल्या आहेत. या सोहळ्यासाठी १,५०० कोटी रुपये जमले आहेत.

BMC Election : जागावाटपाचा तिढा; मुंबई महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गट १२५ जागांसाठी आग्रही

ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आठवडाभरात घोषणा? 'शिवतीर्थ' निवासस्थानी झाली पहिली बैठक; संजय राऊत, अनिल परबांची उपस्थिती

‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी गांधी कुटुंबाला दिलासा; ED चे आरोपपत्र स्वीकारण्यास न्यायालयाचा नकार

ॲप आधारित कार-बाइक मोकाट

पुरवणी मागण्यांच्या टोपी खाली दडलंय काय?