(Photo - X/@PenguinIndia)
आंतरराष्ट्रीय

'फ्लेश' कादंबरीने मारली बाजी; डेव्हिड स्झालाय यांना बुकर पुरस्कार

कॅनेडियन-हंगेरियन-ब्रिटिश लेखक डेव्हिड स्झालाय यांच्या “फ्लेश” या कादंबरीला सोमवारी बुकर पुरस्कार जाहीर झाला. ही कादंबरी एका सामान्य माणसाच्या अनेक दशकांतील आयुष्याची कथा सांगते.

Swapnil S

लंडन : कॅनेडियन-हंगेरियन-ब्रिटिश लेखक डेव्हिड स्झालाय यांच्या “फ्लेश” या कादंबरीला सोमवारी बुकर पुरस्कार जाहीर झाला. ही कादंबरी एका सामान्य माणसाच्या अनेक दशकांतील आयुष्याची कथा सांगते. स्झालाय (५१) यांनी अँड्रू मिलर आणि किरण देसाई यांच्यासारख्या दिग्गजांना मागे टाकत हा प्रतिष्ठित साहित्य पुरस्कार पटकावला आहे. स्झालाय यांना ५० हजार पाैंड रोख रक्कम मिळणार आहे.

या पुरस्कारासाठी सादर झालेल्या १५३ कादंबऱ्यांमधून त्यांची निवड करण्यात आली होती. “फ्लेश” ही ‘जगण्याबद्दल आणि जगण्याच्या विचित्रतेबद्दल’ असलेली कादंबरी आहे. पाच तासांच्या चर्चेनंतर सर्व न्यायाधीशांनी एकमताने 'फ्लेश'ची निवड केली.

स्झालाय यांची ही कादंबरी मितभाषी इस्त्वानच्या आयुष्याचा मागोवा घेते. ज्याचे आयुष्य किशोरावस्थेतील एका वयस्क स्त्रीबरोबरच्या नात्यापासून ब्रिटनमधील संघर्षमय स्थलांतरित आयुष्य आणि नंतर लंडनच्या उच्चभ्रू समाजातील जगण्यापर्यंत पसरलेले आहे. लेखकाने सांगितले आहे की, त्यांना एका हंगेरियन स्थलांतरिताबद्दल आणि “शरीराच्या अनुभवातून जगणे म्हणजे जगात एका जिवंत शरीरासारखे अस्तित्व” याबद्दल लिहायचे होते.

कॅनडामध्ये जन्मलेले, ब्रिटनमध्ये वाढलेले आणि सध्या व्हिएन्नामध्ये राहणारे स्झालाय यांना यापूर्वी २०१६ मध्ये “ऑल दॅट मॅन इज” या कादंबरीसाठी बुकरच्या अंतिम यादीत स्थान मिळाले होते. जी नऊ विविध पुरुषांच्या कथा सांगणारी कादंबरी आहे. ‘फ्लेश’ या कादंबरीचे अनेक समीक्षकांनी कौतुक केले, पण काहींनी तिच्या संथ आणि अपूर्ण कथनावर नाराजी व्यक्त केली.

Mumbai : सँडहर्स्ट रोड रेल्वे दुर्घटनेला जबाबदार कोण? ५ दिवस उलटले तरी FIR नाही

मुंबईत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद; कुर्ला, चेंबूर, घाटकोपर व माटुंगा विभागातील काही परिसरांना झळ बसणार

अचानक बेशुद्ध पडल्याने अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल

मुंबई मनपा आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का; राज्यातील २९ मनपांतील आरक्षण सोडत जाहीर, मुंबई महापालिकेत येणार महिलाराज

ठाणे महापालिकेत ‘महिलाराज’; ६६ महिलांना आरक्षणाचा लाभ, ३३ प्रभागांची रचना निश्चित