डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर लावले ५० टक्के शुल्क  (संग्रहित छायाचित्र)
आंतरराष्ट्रीय

डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर लावले ५० टक्के शुल्क

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातून आयात होणाऱ्या अनेक उत्पादनांवर ५० टक्के नवीन शुल्क (टॅरिफ) लावण्याचे आदेश दिले आहेत.

Swapnil S

न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातून आयात होणाऱ्या अनेक उत्पादनांवर ५० टक्के नवीन शुल्क (टॅरिफ) लावण्याचे आदेश दिले आहेत.

ट्रम्प यांनी आरोप केला की, कॅनडा अमेरिकन दारू, ऑटोमोबाईल आणि दुग्धजन्य पदार्थांशी भेदभावपूर्ण व्यवहार करत आहे. तथापि, नवीन शुल्क ३० दिवसांनंतर लागू होईल.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे,अमेरिका-मेक्सिको-कॅनडा मुक्त व्यापार करारांतर्गत येणारी अनेक उत्पादने देखील आता या नवीन शुल्काच्या (टॅरिफच्या) कक्षेत येतील.

ट्रम्प यांनी या निर्णयासाठी १९३० च्या टॅरिफ कायद्याच्या कलम-३३८ चा वापर केला आहे. तज्ज्ञांनुसार, एखाद्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने पहिल्यांदाच या तरतुदीनुसार टॅरिफ लावण्याचा आदेश दिला आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'पॅन' अन् 'मतदार कार्ड' नागरिकत्वाचा पुरावा नाही; गुवाहाटी उच्च न्यायालयाने फेटाळला दावा

राज्यात हवामान बदलणार; दिवसा उन्हाचा चटका, रात्री थंडीचा कडाका; IMD चा मोठा अंदाज

औषध निर्मिती कंपनीच्या परवाना निलंबनाला HC कडून तात्पुरती स्थगिती; मंत्र्यांनी अपिलावर तातडीने सुनावणी घेण्याचेही दिले निर्देश

बोरिवली-विरार लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; छेडछाडीला विरोध केला म्हणून २० वर्षीय महिलेला लोकलमधून ढकललं; डावा हात गमावला

विदर्भात द्रूतगती मार्गाचे जाळे उभारणार; १२,५०० कोटींहून अधिक खर्च