वॉशिंग्टन : रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांविरुद्ध अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफचे शस्त्र परजले आहे. ट्रम्प यांनी रशियाच्या तेलावरील कडक निर्बंधांवरील विधेयकावर सही केली. या कायद्यानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष १०० टक्के आयातशुल्क लावू शकतात. जे देश रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आहेत, त्यांच्यावर टॅरिफ लावला जाणार आहे. यातून भारत आणि चीनवर शुल्क लागू केला जाऊ शकते.
भारत आणि चीन अमेरिकेच्या निशाण्यावर आहे. अमेरिकेच्या संसदेत या विधेयकासाठी मतदान झाले. या विधेयकाच्या बाजूने २६२ मतदान झाले तर विरोधात १५९ मतदान झाले. त्यानंतर या विधेयकाला मंजुरी मिळाली. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या मोठ्या ५ देशांवर टॅरिफ लावला जाणार आहे. ज्यात भारत चीन देशांचा समावेश आहे.
या कायद्यामुळे रशियावरील वैधानिक निर्बंध, आयातशुल्क आणि बंदीची व्याप्ती वाढणार असून इराणवरील विद्यमान निर्बंधही पुढील कालावधीसाठी वाढवण्यात आले आहेत, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे.