आंतरराष्ट्रीय

मस्क यांनी मागितली ट्रम्प यांची माफी

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या उद्योजक एलॉन मस्क यांनी गेल्या काही दिवसांपासून ट्रम्पविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता मस्क यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची माफी मागितली आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या उद्योजक एलॉन मस्क यांनी गेल्या काही दिवसांपासून ट्रम्पविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता मस्क यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची माफी मागितली आहे.

“गेल्या आठवड्यात मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल शेअर केलेल्या ‘पोस्ट’बद्दल मला खंत आहे, आम्ही खूप पुढे गेलो होतो. आमचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील काही ‘पोस्ट’बद्दल मला पश्चात्ताप होत आहे,” अशी खंत मस्क यांनी व्यक्त केली आहे.

तसेच सेक्स रॅकेटशी संबंध असलेल्या जेफ्री एपस्टिन फाईलमध्ये ट्रम्प यांचे नाव असल्याचा दावाही मस्क यांनी केला होता. इतकेच नव्हे तर त्यानंतर मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातून राजीनामा दिला. यानंतर ट्रम्प यांनीदेखील मस्क यांच्यावर निशाणा साधला होता. मस्क यांच्या कंपन्यांना दिले जाणारे अनुदान आणि सरकारी करार रद्द करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली होती.

‘वन बिग ब्युटीफुल’ धोरणामुळे मतभेद

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ‘टेस्ला’चे सीईओ एलॉन मस्क यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. परंतु आता एलॉन मस्क यांनी माघार घेतल्याचे दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘वन बिग ब्युटीफुल’ धोरणावर मस्क यांनी टीका केली होती. यानंतर हा वाद सुरू झाला होता. ट्रम्प माझ्याशिवाय निवडणूक जिंकू शकले नसते, असेही मस्क यांनी म्हटले होते.

मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना दिलासा; ३० दिवसांची व्हिसा मुदतवाढ, ओव्हरस्टे दंडही माफ

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

एका दिवसात ४५ हजार गॅस सिलिंडरचे वितरण; ठाणे शिधावाटप विभागाचा दावा; घरगुती पुरवठा सुरळीत, व्यावसायिकवर तात्पुरती मर्यादा

मुंबईकरांनो सावधान, यंदा पावसाळ्यात समुद्राला उधाण; २४ दिवस समुद्रात उसळणार मोठ्या लाटा

बालकांच्या सायबर सुरक्षिततेसाठी ‘डिजिटल कवच’ आवश्यक; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती