चार भारतीय खलाशांचा युक्रेनमध्ये मृत्यू (Photo-X)
आंतरराष्ट्रीय

Russia-Ukraine War : चार भारतीय खलाशांचा युक्रेनमध्ये मृत्यू

युक्रेनमधील ओडेसा बंदरातून बाहेर पडणाऱ्या ‘एमव्ही गोल्डन लिओ’ या व्यापारी मालवाहू जहाजावर रशियाकडून करण्यात आलेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक भारतीय नागरिक गंभीर जखमी झाला आहे.

Swapnil S

मुंबई : युक्रेनमधील ओडेसा बंदरातून बाहेर पडणाऱ्या ‘एमव्ही गोल्डन लिओ’ या व्यापारी मालवाहू जहाजावर रशियाकडून करण्यात आलेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक भारतीय नागरिक गंभीर जखमी झाला आहे. या जहाजावर एकूण १७ कर्मचारी तैनात होते. ज्यामध्ये पाच भारतीयांचा समावेश होता. युक्रेनच्या नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, गिनी-बिसाऊ देशाचा ध्वज असलेल्या या जहाजावर रशियाने तीन क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यामुळे जहाजाला भीषण आग लागली. रात्रभर चाललेल्या बचाव मोहिमेदरम्यान एक पायलट आणि नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. हे जहाज मका घेऊन जात होते आणि त्यावर भारत तसेच सीरियाचे कर्मचारी कार्यरत होते.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या दुर्दैवी घटनेवर तीव्र दुख व्यक्त करत या हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध केला आहे. आंतरराष्ट्रीय सागरी सीमेत व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे, निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात घालणे आणि व्यापार स्वातंत्र्यात अडथळा आणणे अत्यंत निंदनीय असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

जखमी भारतीय खलाशावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून युक्रेनमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पीडित आणि मृत भारतीयांच्या कुटुंबांना सर्वतोपरी मदत पुरवली जात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण