आंतरराष्ट्रीय

होर्मुझची स्थिती युद्धापूर्वीसारखी राहणार नाही; ताबा आता इराणकडे - मोहम्मद बाकर गलिबाफ

‘होर्मुझची सामुद्रधुनी’ आता युद्धापूर्वीच्या स्थितीत परतणार नाही आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करत इराण स्वतः या धोरणात्मक जलमार्गाचे व्यवस्थापन करेल असे अत्यंत महत्त्वाचे विधान इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाकर गलिबाफ यांनी केले आहे.

Swapnil S

तेहरान : ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ आता युद्धापूर्वीच्या स्थितीत परतणार नाही आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करत इराण स्वतः या धोरणात्मक जलमार्गाचे व्यवस्थापन करेल असे अत्यंत महत्त्वाचे विधान इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाकर गलिबाफ यांनी केले आहे. यापुढे या महत्त्वपूर्ण सागरी मार्गावर इराणचे नियंत्रण असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या तांत्रिक चर्चेच्या पहिल्या फेरीनंतर परतल्यावर गलिबाफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या १४ कलमी सामंजस्य कराराचा हा एक भाग होता.

प्रमुख मुद्दे

प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की होर्मुझ सामुद्रधुनीचे प्रशासन आता कधीही पूर्वीसारखे राहणार नाही. अर्थात, आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केले जाईल, परंतु प्रशासन इराणच्या हातात असेल, असे गलिबाफ यांनी ठामपणे सांगितले. स्वित्झर्लंडमधील चर्चेदरम्यान इराणने आपली 'वाटाघाटी करण्याची ताकद' सिद्ध केली असल्याचा दावा त्यांनी केला. चर्चेदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या 'प्रॉक्सी गटांना' (विशेषतः हिजबुल्लाह) पाठिंबा देण्याबाबत केलेली सोशल मीडिया पोस्ट इराणच्या दबावामुळे तासाभरात बदलण्यास भाग पाडल्याचा दावाही त्यांनी केला.

अमेरिकेवर अविश्वास

आम्ही अमेरिकेवर कधीही विश्वास ठेवला नाही, आजही ठेवत नाही आणि भविष्यातही अविश्वास ठेवणे हेच योग्य आहे, असे ते म्हणाले. प्रादेशिक शांततेत योगदान: स्वित्झर्लंडमधील चर्चेत सहभागी झाल्यामुळेच लेबनॉनमधील तणाव वाढण्यापासून रोखला गेला आणि मोठा रक्तपात टळला, असेही त्यांनी नमूद केले. तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यातील या चर्चेचे फलित म्हणून इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करणे आणि तेलावरील निर्बंध शिथिल करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. देशांतर्गत एकतेवर भर देत, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद मुज्तबा खामेनी यांचे आदेशच अंतिम असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वन्यजीव हल्ले, मृतांच्या नातेवाईकांना नोकरी; राज्यातील संघर्ष रोखण्यासाठी ‘रॅबिट फार्मिंग’ आणि हरिण संवर्धनावर भर

‘एफसीआरए’चे नियम कडक; दंडात वाढ

फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट; दोन्हीकडे 'रेड अलर्ट' जारी, ४० जणांचा मृत्यू

Tamilnadu : निवृत्त महिला अधिकारी माकडांच्या सहचरी

भवानीपूर निवडणूक याचिका: कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी भावाच्या भाजप संबंधांची केली जाहीर कबुली