प्रातिनिधिक छायाचित्र  
आंतरराष्ट्रीय

रशियन तेल खरेदी थांबवण्याची भारताची तयारी; व्हाइट हाऊसने दिली माहिती

भारतासोबत झालेल्या नव्या व्यापार कराराचे ‘व्हाइट हाऊस’ने स्वागत करताना, भारताने आता “रशियन तेल खरेदी न करण्याची” बांधिलकी घेतल्याचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील विविध महत्त्वाच्या क्षेत्रांत ५०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यास सहमती दर्शविल्याचे सांगितले आहे.

Swapnil S

न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : भारतासोबत झालेल्या नव्या व्यापार कराराचे ‘व्हाइट हाऊस’ने स्वागत करताना, भारताने आता “रशियन तेल खरेदी न करण्याची” बांधिलकी घेतल्याचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील विविध महत्त्वाच्या क्षेत्रांत ५०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यास सहमती दर्शविल्याचे सांगितले आहे.

ही माहिती व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी दिली. “राष्ट्राध्यक्षांनी भारतासोबत आणखी एक उत्कृष्ट व्यापार करार केला आहे. त्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. दोघांमध्ये अतिशय चांगले संबंध आहेत. भारताने आता केवळ रशियन तेल खरेदी थांबवण्याचीच नव्हे, तर अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याची, तसेच शक्यतो व्हेनेझुएलाकडूनही तेल घेण्याची तयारी दर्शवली आहे. याचा थेट फायदा अमेरिकन जनता आणि अर्थव्यवस्थेला होणार आहे,” असे लेव्हिट यांनी पत्रकारांना सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी वाहतूक, ऊर्जा आणि कृषी क्षेत्रांसह अमेरिकेतील विविध क्षेत्रांत ५०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचीही बांधिलकी दाखवली आहे. “हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वामुळे शक्य झालेले आणखी एक मोठे व्यापारी यश आहे,” असे त्या म्हणाल्या.

या करारानुसार भारतावर अमेरिकेचा आयात शुल्क दर आता १८ टक्के असेल, तर अमेरिकेतील वस्तूंवर भारताकडून कोणतेही शुल्क (० टक्के) आकारले जाणार नाही. हा करार अमेरिकन कामगार, उद्योग आणि ग्राहकांसाठी मोठा विजय आहे, असे लेव्हिट यांनी नमूद केले.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार