Iran vs US-Israel War : इराणचा पूल पाडला; ८ ठार, ट्रम्प म्हणाले - 'बरेच काही घडणार आहे!' (Photo-X)
आंतरराष्ट्रीय

Iran vs US-Israel War : इराणचा पूल पाडला; ८ ठार, ट्रम्प म्हणाले - 'बरेच काही घडणार आहे!'

अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ला करून करजमधील बी१ पुलाचे मोठे नुकसान झाले.

Swapnil S

तेहरान : अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ला करून करजमधील बी१ पुलाचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यात किमान आठ नागरिक ठार झाले असून ९५ जण जखमी झाले आहेत, असे इराणच्या सरकारी वृत्तसंस्था 'प्रेस टीव्ही'ने वृत्त दिले आहे. इराणमधील सर्वात मोठा पूल कोसळला, तो पुन्हा कधीही वापरला जाणार नाही. यापुढे बरेच काही घडणार आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांनी म्हटले असून त्यांनी इराणला "खूप उशीर होण्यापूर्वी करार करा," असा इशाराही दिला आहे.

'करजमधील बी१ पुलाला' लक्ष्य करण्यात आल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या वेळी पुलाच्या जवळ असलेले इराणी प्रवासी आणि स्थानिक गावातील रहिवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नवरोजदिनानिमित्त परिसरात आलेल्या कुटुंबांचाही समावेश आहे. या दिवशी नेहमीप्रमाणे अनेक लोक घराबाहेर होते. या घटनेनंतर आता इराणच्या नागरी वस्त्यांवर अधिकाधिक हल्ले करण्याचे संकेत इस्रायल व अमेरिकेने दिले आहेत.

दरम्यान, इराण सर्व क्षमतांचा वापर करून अमेरिकन आणि इस्रायली आक्रमकांविरुद्ध स्वतःचा बचाव करण्यासाठी खंबीर आहे, असे इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी म्हटले आहे. इस्लामिक प्रजासत्ताकाविरुद्धचे विनाकारण आक्रमक युद्ध करण्यात येत असल्याचा इराणचा आरोप आहे.

ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या अमेरिकेच्या हल्ल्याचे कौतुक केले. तेहरानने सध्या वॉशिंग्टनसोबत चर्चा करण्यास नकार दिला. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेशी वाटाघाटी करणं अशक्य आहे.

Mumbai : ठाकरे बंधूंची आज दादरमध्ये विजयी सभा; तरुणांनी भीती घालवली - उद्धव ठाकरे

Mumbai : मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून १३६.१० कोटींचे उत्पन्न

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईत तस्करीपेक्षा अमली पदार्थ सेवनाचे गुन्हे अधिक; ड्रग्जविरोधात पोलिसांचे युद्ध

Mumbai : जन्म दाखल्यासाठी सॉफ्टवेअर आणणार; मानखुर्द, कुर्ल्यातील दाखल्यांचा तत्काळ निपटारा करा, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश