नवस पूर्ण करण्यासाठी हत्तीच्या मूर्तीखालून रांगत गेला; पण पुढे घडलं असं काही की मदतीसाठी धावले भाविक, Video व्हायरल

मूर्तीच्या दोन पायांमधील अरुंद जागेतून कोणतीही अडचण न येता बाहेर पडल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
नवस पूर्ण करण्यासाठी हत्तीच्या मूर्तीखालून रांगत गेला; पण पुढे घडलं असं काही की मदतीसाठी धावले भाविक, Video व्हायरल
नवस पूर्ण करण्यासाठी हत्तीच्या मूर्तीखालून रांगत गेला; पण पुढे घडलं असं काही की मदतीसाठी धावले भाविक, Video व्हायरल(X व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
Published on: 

भोपाळ (मध्य प्रदेश) : नवस पूर्ण व्हावा म्हणून केलेला एक प्रयत्न भाविकाच्या चांगलाच अंगलट आला. मध्य प्रदेशातील अमरकंटक येथील नर्मदा मंदिरात हत्तीच्या मूर्तीच्या दोन पायांमधून रांगत जाण्याचा प्रयत्न करताना एक भाविक मध्येच अडकला. त्याला बाहेर काढण्यासाठी मंदिरातील इतर भाविकांना मदतीला धावावे लागले. या घटनेचा २ मिनिटे ५ सेकंदांचा व्हिडीओ सोमवारी (दि. २३) सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, ही घटना नेमकी कधी घडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काय आहे हत्तीच्या मूर्तीशी संबंधित धार्मिक श्रद्धा?

अमरकंटक येथील नर्मदा मंदिर परिसरात काळ्या दगडातील हत्ती आणि घोड्याच्या मूर्ती आहेत. यातील हत्तीच्या मूर्तीशी एक स्थानिक धार्मिक श्रद्धा जोडलेली आहे. या मूर्तीच्या दोन पायांमधील अरुंद जागेतून कोणतीही अडचण न येता बाहेर पडल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. काही जण या विधीकडे चांगल्या-वाईट कर्मांची परीक्षा म्हणूनही पाहतात.

नवस पूर्ण करण्यासाठी हत्तीच्या मूर्तीखालून रांगत गेला; पण पुढे घडलं असं काही की मदतीसाठी धावले भाविक, Video व्हायरल
UP Viral Video : घटस्फोट न घेताच दुसऱ्या लग्नाचा घाट; बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात, पहिल्या पत्नीने उधळला डाव

याच श्रद्धेतून एका भाविकाने हत्तीच्या मूर्तीच्या पायांमधील अरुंद जागेतून रांगत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्ध्या वाटेतच तो अडकला. जागा अरुंद असल्याने त्याला स्वतःहून बाहेर पडता येत नव्हते. त्याने सुटकेसाठी बरेच प्रयत्न केले, पण त्याला यश मिळाले नाही.

भाविक अडकला अन् मंदिरात उडाली धावपळ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हत्तीच्या मूर्तीभोवती अनेक भाविक जमा झाल्याचे दिसते. मूर्तीच्या पायांमध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी काही जण पुढे सरसावले. त्यांनी त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्या भाविकाची सुटका झाली. विशेष म्हणजे, हा प्रकार घडूनही इतर भाविकांनी हा विधी करणे थांबवले नाही. एक भाविक अडकलेला असतानाही काही जण त्याच अरुंद जागेतून जाण्यासाठी पुढे येत असल्याचे सांगितले जात आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. हत्तीच्या मूर्तीशी संबंधित धार्मिक श्रद्धा आणि त्यासाठी केलेल्या या प्रयत्नावर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. नवस पूर्ण करण्याच्या प्रयत्नात भाविक अडकल्याचा हा प्रसंग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)