Iran vs US-Israel War : इराणने अमेरिकेचे विमान पाडले 
आंतरराष्ट्रीय

Iran vs US-Israel War : इराणने अमेरिकेचे विमान पाडले

मध्यपूर्वेत युद्ध सुरू होऊन महिना उलटला आहे. २८ फेब्रुवारीपासून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष सुरू आहे.

Swapnil S

तेहरान : मध्यपूर्वेत युद्ध सुरू होऊन महिना उलटला आहे. २८ फेब्रुवारीपासून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष सुरू आहे. इराणने अमेरिकेचं एफ-३५ लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे. पण या विमानाचे अवशेष पाहता ते विमान एफ-३५ नव्हे, तर एफ-१५ ई असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विमानाच्या पायलटला पकडल्याचा दावा इराणी न्यूज एजन्सी तस्नीमने केला आहे.

इराणने अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्यावर अमेरिकेची अनेक हेलिकॉप्टर्स इराणच्या आकाशात घिरट्या घालत होती. वैमानिकाच्या सुटकेसाठी अमेरिकेची हेलिकॉप्टर्स आली होती. यातील एक ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा इराणने केला आहे. इराणच्या कोहगिलुयेह आणि बोयर-अहमद प्रांतातील तस्नीम वृत्तसंस्थेच्या एका पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, विमानावर हल्ला होताच वैमानिकाने स्वत:ला इजेक्ट केले. तो इराणच्या हद्दीत सुरक्षित उतरला.

अमेरिकेच्या सैन्याने वैमानिकाचा शोध घेण्याचा आणि त्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचा वैमानिक इराणी सैन्याच्या हाती लागला. यानंतर अमेरिकेच्या सैन्याने वैमानिकाला परत नेण्यासाठी मोहीम हाती घेतली. यासाठी ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स आणि एक हर्क्युलिस सी-१३० विमान झेपावले. पण ही मोहीम अपयशी ठरली.

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार