आंतरराष्ट्रीय

इराण-अमेरिकेत पुन्हा संघर्ष

होर्मुझ सामुद्रधुनीत सिंगापूरच्या मालवाहू जहाजावर इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर, अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही देशांमध्ये या आठवड्याच्या सुरुवातीलाच युद्धविराम करार झाला होता, मात्र त्यानंतर झालेली ही पहिली थेट लष्करी कारवाई असल्याचे मानले जात आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : होर्मुझ सामुद्रधुनीत सिंगापूरच्या मालवाहू जहाजावर इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर, अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही देशांमध्ये या आठवड्याच्या सुरुवातीलाच युद्धविराम करार झाला होता, मात्र त्यानंतर झालेली ही पहिली थेट लष्करी कारवाई असल्याचे मानले जात आहे.

या संघर्षामुळे नुकत्याच झालेल्या युद्धविराम कराराच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पश्चिम आशियातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. युएस सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी ओमानच्या किनारपट्टीजवळ होर्मुझ सामुद्रधुनीतून जात असलेल्या 'एमव्ही एव्हर लव्हली' या व्यापारी जहाजावर इराणने एकतर्फी ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने २६ जून रोजी इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन साठवणूक केंद्रांवर तसेच किनारपट्टीवरील रडार प्रणालींवर एअरस्ट्राइक केले.

युद्धविरामाचे उल्लंघन

अमेरिकेने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, इराणचे कृत्य युद्धविराम कराराचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. सेंट्रल कमांडने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, व्यापारी नौकानयनावरील ही आक्रमकता आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या मार्गातील सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी आहे. आम्ही व्यापारी जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी कटिबद्ध आहोत.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड