Thane : दिवाळीतील पाणीकपात रद्द; २ आणि ९ नोव्हेंबरचा शटडाऊन स्थगित

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ठाणेकरांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी २ आणि ९ नोव्हेंबर रोजी नियोजित असलेला पाणीपुरवठ्याचा शटडाऊन रद्द करण्यात आला आहे.
Thane : दिवाळीतील पाणीकपात रद्द; २ आणि ९ नोव्हेंबरचा शटडाऊन स्थगित
Thane : दिवाळीतील पाणीकपात रद्द; २ आणि ९ नोव्हेंबरचा शटडाऊन स्थगितसंग्रहित छायाचित्र
Published on: 

ठाणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ठाणेकरांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी २ आणि ९ नोव्हेंबर रोजी नियोजित असलेला पाणीपुरवठ्याचा शटडाऊन रद्द करण्यात आला आहे. आता १६ नोव्हेंबरपासून पुढे दर सोमवारी शटडाऊन घेण्यात येणार आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी हा निर्णय घेतला आहे.

Thane : दिवाळीतील पाणीकपात रद्द; २ आणि ९ नोव्हेंबरचा शटडाऊन स्थगित
मीरा-भाईंंदरमध्ये १० टक्के पाणीकपात लागू; आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा खंडित

स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अँड इन्फ्रा. प्रा. लि. कंपनीमार्फत दर सोमवारी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, दिवाळीच्या काळात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी महापौरांनी पाणीपुरवठा विभागाशी चर्चा करून शटडाऊन न घेण्याच्या सूचना दिल्या.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)