Iran vs US-Israel War : बँका व आर्थिक केंद्रांना लक्ष्य करणार; इराणचा अमेरिका, इस्रायलला इशारा  Photo : X
आंतरराष्ट्रीय

Iran vs US-Israel War : बँका व आर्थिक केंद्रांना लक्ष्य करणार; इराणचा अमेरिका, इस्रायलला इशारा

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आता संपूर्ण जगाला फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच अमेरिकेने इराणच्या बँकेला लक्ष्य केल्यानंतर आता इराणनेही मध्यपूर्वेतील बँका आणि वित्तीय संस्थांना लक्ष्य करण्याचा इशारा अमेरिका, इस्रायलला दिला आहे.

Swapnil S

तेहरान : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आता संपूर्ण जगाला फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच अमेरिकेने इराणच्या बँकेला लक्ष्य केल्यानंतर आता इराणनेही मध्यपूर्वेतील बँका आणि वित्तीय संस्थांना लक्ष्य करण्याचा इशारा अमेरिका, इस्रायलला दिला आहे.

इराणच्या संयुक्त लष्करी कमांड, खातम अल-अंबिया मुख्यालयाने बुधवारी याबाबतची घोषणा केली. इराणी लष्करी कमांडच्या या घोषणेमुळे दुबई, सौदी अरेबिया आणि बहारिनसारख्या प्रमुख मध्यपूर्वेतील आर्थिक केंद्रांमध्ये घबराट पसरली आहे. या संस्था आमच्या रडारवर असून त्यांना कोणत्याही क्षणी लक्ष्य केले जाऊ शकते. मध्यपूर्वेतील सर्वात मोठे आर्थिक केंद्र मानल्या जाणाऱ्या दुबईमध्ये असलेल्या हजारो आंतरराष्ट्रीय बँका आणि गुंतवणूक कंपन्यांना यामुळे गंभीर सुरक्षा धोका निर्माण झाला आहे.

इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात तेहरानस्थित बँकेचे अनेक कर्मचारी मारले गेले. हे हल्ले ऑपरेशन एपिक फ्युरीचा भाग होते, ज्यामध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि अनेक वरिष्ठ कमांडर मारले गेले. या हल्ल्यांना क्रूर म्हणत इराणने आता थेट आर्थिक पायाभूत सुविधा नष्ट करण्याची धमकी दिली आहे.

आतापर्यंत, हा संघर्ष प्रामुख्याने लष्करी तळ आणि सीमावर्ती भागांपुरता मर्यादित होता, परंतु बँकांना लक्ष्य करण्याच्या धोक्यामुळे संपूर्ण जगात अस्थिरता निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, इराणने या वित्तीय संस्थांवर हल्ला केला तर त्याचा थेट परिणाम जागतिक शेअर बाजारांवर आणि तेलाच्या किमतींवर होईल.

दुबई आणि सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आहे, त्यामुळे कोणत्याही लष्करी कारवाईमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ड्रोन हल्ल्यांद्वारे इराणने आधीच आपली क्षमता दाखवून दिली आहे. आता, बँकांना लक्ष्य करण्याची ही नवीन रणनीती मध्यपूर्वेतील चालू संघर्षाला एका नवीन आणि विनाशकारी टप्प्यावर घेऊन जाऊ शकते.

पर्याय म्हणून केरोसिन वापरा -छगन भुजबळ

सध्या जगभरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्यावर तातडीने उपाय करणे कठीण आहे. गॅसचा तुटवडा असल्याची वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही. मात्र, सध्या जगभरात अस्थिरता आहे. केंद्र सरकारने राज्य सरकार तसेच गॅस उत्पादक कंपन्यांना पत्र पाठवून एलपीजी गॅस निर्मिती वाढवण्याचे आदेश दिले आहेत. पर्याय म्हणून हॉटेल्सनी केरोसिनचा वापर करण्याचा विचार करावा, असे आवाहनही राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

खतांच्या पुरवठ्यावर परिणाम होणार

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक स्तरावर खत पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युद्ध तसेच इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे भारताला होणाऱ्या खतपुरवठा साखळीत २० ते २५ टक्के व्यत्यय येण्याची शक्यता आहे. यूएई, कतार, सौदी अरेबिया आणि ओमानमधून तेलांप्रमाणेच खतांची वाहतूक याच होर्मुझ सामुद्रधुनीतून होते.

देशभरात एलपीजी गॅसची टंचाई

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा १२ दिवस असून, देशभरात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. गॅस सिलिंडर घेण्यासाठी देशभरातील एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पंजाबमध्ये घरगुती गॅसची बुकिंग बंद झाली आहे. लग्नकार्यासाठी अतिरिक्त सिलिंडर मिळणे जवळपास बंद झाले आहे. यूपी-बिहारमध्ये पोलिसांच्या संरक्षणात सिलिंडरचे वाटप सुरू आहे.

इंडक्शन कुकटॉप्सचा साठा संपला

देशात एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने लोक आता विजेवर चालणाऱ्या इंडक्शन कुकटॉप्सकडे वळले आहेत. मात्र, देशभरातील अनेक मेट्रो शहरांमध्ये पर्यायी व्यवस्था असलेल्या इंडक्शन कुकटॉप्सचा साठा संपला आहे. ऑनलाइन खरेदी प्लॅटफॉर्मवर इंडक्शन स्टोव्हची विविध मॉडेल्स ‘आऊट ऑफ स्टॉक्स’ गेल्याचे दाखवले जात आहे. गुगलच्या ट्रेंडनुसार, भारतात ‘इंडक्शन कुकटॉप’ या शब्दाच्या सर्चमध्ये मोठी वाढ झाली आहे.

प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांना 'QR कोड' अनिवार्य; टॅक्सी, रिक्षा, ॲप आधारित वाहनांना भाडे स्वीकारावेच लागणार; ३ महिन्यांत निर्णय लागू

एसटी महामंडळात लवकरच महाभरती; चालक-वाहकांची १७ हजार ७४२ पदे भरणार

कर्ज वाढले तरी राज्याची आर्थिक स्थिती मजबूत! मुख्यमंत्र्यांचा दावा; शेतकरी कर्जमाफीचे निकष लवकरच जाहीर करणार

अलिबाग पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा; तब्बल ४६ वर्षांनंतर शेकापचा लालबावटा उतरला

ओम बिर्ला यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला