'जैश' चे आता महिला दहशतवादी पथक 
आंतरराष्ट्रीय

'जैश' चे आता महिला दहशतवादी पथक

पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला दणका दिल्यानंतर आता ‘जैश-ए-मोहम्मद’ ही संघटना पुन्हा एकदा घातक कारवाया करण्यासाठी सज्ज झाली आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’ने महिला दहशतवाद्यांचे एक वेगळे पथक स्थापन केले आहे.

Swapnil S

इस्लामाबाद : पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला दणका दिल्यानंतर आता ‘जैश-ए-मोहम्मद’ ही संघटना पुन्हा एकदा घातक कारवाया करण्यासाठी सज्ज झाली आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’ने महिला दहशतवाद्यांचे एक वेगळे पथक स्थापन केले आहे. ‘जमात-उल-मोमिनत’ या नावाने सक्रिय असलेल्या या महिला पथकाची जबाबदारी ‘जैश-ए-मोहम्मद’चा दहशतवादी मसूद अझहर याची बहीण सादिया अझहर हिच्याकडे सोपवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’च्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सादियाचा पती यूसुफ अजहर ठार झाला होता. त्यानंतर सादिया अधिक आक्रमक झाली असून महिला दहशतवादी पथकाची जबाबदारी तिने आपल्या खांद्यावर घेतली आहे. जैशने अलिकडेच बहावलपूर, कराची, मुझफ्फराबाद, कोटली, हरिपूर, मानसेहरा येथील त्यांच्या मरकझमध्ये शिकणाऱ्या गरीब महिलांना आणि त्यांच्या दहशतवादी कमांडरच्या पत्नींना दहशतवादी संघटनेच्या महिला पथकात सामील करून घेतले आहे. नवीन युनिटसाठी भरती प्रक्रिया ८ ऑक्टोबरपासून पाकिस्तानातील बहावलपूर येथील मरकझ उस्मान-ओ-अली येथे सुरू झाली आहे.

‘जैश-ए-मोहम्मद’ने यापूर्वी महिलांना आपल्या कारवायांमध्ये सामील करून घेतले नव्हते. मात्र, पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर नियम बदलत मसूद अझहर आणि त्याचा भाऊ तल्हा अल-सैफ यांनी महिलांना पथकात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. महिलांचे ब्रेनवॉश करणे आणि त्यांना त्यांच्या नेटवर्कमध्ये समाविष्ट करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. ही ब्रिगेड जैशच्या महिला शाखेच्या रूपात तयार करण्यात आली आहे, जी सायकॉलॉजिकल वॉरफेअर म्हणजेच मनावर परिणाम करणारा प्रचार आणि ग्राऊंड लेव्हलवर भरती करण्याचे काम करते. या गटाच्या कारवाया सोशल मीडिया, व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि काही मदरशांच्या नेटवर्कद्वारे सतत सुरू आहेत.

सुशिक्षित महिलाही निशाण्यावर

गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, धार्मिक रंग देण्यासाठी मक्का आणि मदिनाचे फोटो 'जैश 'च्या या नवीन सर्क्युलरमध्ये लावण्यात आले आहेत. तसेच, या सवर्क्युलरमध्ये अनेक भावनिक गोष्टीदेखील लिहिण्यात आल्या आहेत. सुशिक्षित आणि शहरी मुस्लिम महिलांना निशाणा करत त्यांना प्रभावित करण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. महिलांच्या भावनांना हात घालणे आणि त्यांना त्यांच्या संघटनेच्या उद्देशाची जाणीव करून देण्यासाठी, या अभियानाद्वारे सर्व प्रयत्न केले जात आहेत.

सरकारकडून शेती कर्जवसुलीला स्थगिती

मनपा निवडणुकीत युती म्हणूनच लढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

डिजिटल युगात मुलींच्या सुरक्षेबाबत सरन्यायाधीश भूषण गवई यांना चिंता

'पंतप्रधान धन-धान्य कृषी' योजनेचा शुभारंभ; ४२ हजार कोटींची योजना

अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना मज्जाव; देशभरातून संताप