मेक्सिको ड्रग माफियाच्या मृत्यूमुळे २० राज्यांमध्ये हिंसाचाराचा उद्रेक Photo : X
आंतरराष्ट्रीय

मेक्सिको ड्रग माफियाच्या मृत्यूमुळे २० राज्यांमध्ये हिंसाचाराचा उद्रेक

मेक्सिकोमध्ये ड्रग माफियांचा म्होरक्या एल मेंचो याच्या मृत्यूनंतर देशभर हिंसक निदर्शने झाली. मेंचोच्या समर्थकांनी २० राज्यांमध्ये हिंसाचार घडविला असून अनेक ठिकाणी रस्ते अडवण्यात आले. गाड्या आणि तसेच २० हून अधिक सरकारी बँकांच्या शाखांना आगी लावण्यात आल्या.

Swapnil S

मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये ड्रग माफियांचा म्होरक्या एल मेंचो याच्या मृत्यूनंतर देशभर हिंसक निदर्शने झाली. मेंचोच्या समर्थकांनी २० राज्यांमध्ये हिंसाचार घडविला असून अनेक ठिकाणी रस्ते अडवण्यात आले. गाड्या आणि तसेच २० हून अधिक सरकारी बँकांच्या शाखांना आगी लावण्यात आल्या. जालिस्कोमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती आहे. हे शहर फिफा २०२६ च्या यजमान शहरांपैकी एक आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये किमान ३२ मृत्यू झाले आहेत, ज्यात २५ सैनिकांचा समावेश आहे. ऑपरेशनदरम्यान, सैन्याने बख्तरबंद गाड्या आणि रॉकेट लाँचरसह मोठ्या संख्येने शस्त्रे जप्त केली.

मेक्सिकोमध्ये सैन्याने रविवारी एक ऑपरेशन राबवून देशातील सर्वात मोठा ड्रग माफियाचा म्होरक्या एल मेंचो याला ठार केले. लष्कराच्या ऑपरेशनदरम्यान तो जखमी झाला होता. त्याला एअरलिफ्ट करून मेक्सिको सिटीला नेले जात होते, परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या ऑपरेशनमध्ये मेंचो व्यतिरिक्त इतर ९ गुन्हेगारही मारले गेले. एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, एल मेंचो हा जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलचा (सीजेएनजी) प्रमुख होता. जलिस्को कार्टेल मेक्सिकोमध्ये ड्रग्ज बनवणे आणि विकणे, स्थानिक व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करणे आणि अनेक भागांमध्ये लोकांना धमकावून ठेवण्यासाठी कुख्यात आहे.

या कार्टेलची उपस्थिती अमेरिकेच्या ५० राज्यांमध्ये आहे. अमेरिकन सरकारने अल मेंचोवर १३६ कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बऱ्याच काळापासून मेक्सिकोवर एल मेंचोवर कारवाई करण्यासाठी दबाव टाकत होते.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग