X | @jacksonhinklle
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानची समुद्री ताकद वाढणार! चीन नव्या 'हँगोर' पाणबुड्या देणार

पाकिस्तान आणि चीनमध्ये झालेल्या करारानुसार, पाकिस्तानला चीनकडून आठ प्रगत ‘हँगोर श्रेणी’च्या डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या मिळणार आहेत.

Krantee V. Kale

लाहोर : पाकिस्तान आणि चीनमध्ये झालेल्या करारानुसार, पाकिस्तानला चीनकडून आठ प्रगत ‘हँगोर श्रेणी’च्या डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या मिळणार आहेत. या नवीन पाणबुड्यांच्या ताफ्यासह पाकिस्तान हिंदी महासागराच्या उत्तरेकडील भागात भारताला आव्हान देण्यासाठी आपली नौदल क्षमता वाढवण्याच्या तयारीत आहे.

पाकिस्तानचे नौदलप्रमुख ॲॅडमिरल नविद अशरफ यांनी सांगितले की, ‘‘चीनने तयार केलेल्या पाणबुड्या लवकरच पाकिस्तानी नौदलात सामील होतील. चीन आणि पाकिस्तानने संयुक्तपणे बांधलेल्या हँगोर-श्रेणीतील पाणबुड्यांची पहिली तुकडी २०२६ पर्यंत पाक नौदलाच्या सेवेत दाखल होण्याची अपेक्षा आहे.” पहिल्या चार पाणबुड्या चीनमध्ये तयार केल्या जात आहेत, तर शिपयार्ड अँड इंजिनीअरिंग वर्क्स येथे झालेल्या तंत्रज्ञान हस्तांतरण करारानुसार, उर्वरित चार पाणबुड्यांची निर्मिती पाकिस्तानध्ये केली जाईल.

रशिया भारताला ‘एसयू-५७’ लढाऊ विमाने देणार

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतल्यानंतर रशियाने भारताला ‘एसयू-५७’ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्याची तयारी दाखवली आहे.

रशियन ‘एसयू-५७’ विमाने अमेरिकेच्या ‘एफ-३५’ला टक्कर देणारी मानली जातात. ‘एसयू-५७’ प्रमाणेच, ‘एफ-३५’ हे पाचव्या पिढीतील लढाऊ विमान आहे. अमेरिका बऱ्याच काळापासून भारताला ‘एफ-३५’ विकण्याचा प्रयत्न करत आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची आज मुंबईकडे कूच; आझाद मैदानावर एकटेच उपोषण करणार

महागाई भडकली! घाऊक महागाईचा दर ९.९२ टक्क्यांवर; किरकोळ महागाई ४.८२ टक्क्यांवर, अन्न, इंधन आणि उत्पादित वस्तू महागल्या

राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात UCC विधेयक मांडण्याच्या तयारीत - देवेंद्र फडणवीस

संस्कृती आणि भाषांच्या संवर्धनातूनच ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ मजबूत होईल; अखिल भारतीय राजभाषा संमेलनात अमित शहा यांचे प्रतिपादन

‘एस-४००’ ने ३१४ किमीवरील पाकिस्तानी विमान पाडले; संरक्षण खात्याच्या ताज्या अहवालात उघड