PTI
आंतरराष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच ब्रुनेई देशाच्या दौऱ्यावर पोहचले आहेत. मोदी यांचे विमानतळावर क्राऊन प्रिन्स हिज रॉयल हायनेस प्रिन्स हाजी अल-मुहतादी बिल्लाह यांनी स्वागत केले.

Swapnil S

ब्रुनेई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच ब्रुनेई देशाच्या दौऱ्यावर पोहचले आहेत. मोदी यांचे विमानतळावर क्राऊन प्रिन्स हिज रॉयल हायनेस प्रिन्स हाजी अल-मुहतादी बिल्लाह यांनी स्वागत केले. भारत आणि ब्रुनेई यांच्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला ४० वर्षे होत असतानाच हा दौरा होत आहे.

पंतप्रधान मोदी ब्रुनेईची राजधानी बंदर सेरी बेगवान येथे पोहोचले. तेथे अनिवासी भारतीयांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी हॉटेलबाहेर उपस्थित लोकांनी मोदी-मोदी अशा घोषणाही दिल्या.

दौऱ्यावर जाण्यापूर्वी ते म्हणाले, "ब्रुनेई आणि सिंगापूर हे भारताच्या ‘पूर्वेकडे पहा’ या धोरणात आणि इंडो-पॅसिफिकच्या दृष्टिकोनात महत्त्वाचे भागीदार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे केवळ दोन देशांसोबतच नव्हे, तर मोठ्या आसियान क्षेत्रासोबतची भारताची भागीदारी आणखी मजबूत होईल.

दोन्ही देशांतील संबंध अधिक व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत बनले पाहिजेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी व ब्रुनेईचे सुल्तान हसनल बोलकिया यांच्याशी चर्चा होणार आहे.

पंतप्रधान मोदी तेथील सुलतानांसोबत सेमीकंडक्टर क्षेत्रात सहकार्य वाढवणे तसेच भारताने ब्रुनेईच्या हायड्रोकार्बन क्षेत्रात २७० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. द्विपक्षीय चर्चेत, पंतप्रधान नैसर्गिक वायूची गरज पूर्ण करण्यासाठी गुंतवणुकीसंदर्भात तेथील सुलतानांसोबत चर्चा करतील.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी